खायला काही नाही, यायचं कसं? हरियाणामध्ये अडकली नगरमधील 350 तरुण!

खायला काही नाही, यायचं कसं? हरियाणामध्ये अडकली नगरमधील 350 तरुण!

या सर्वांचे तिथे खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल झाले. ज्या कंत्राटदाराच्या संपर्कातून ही मुलं हरियाणाला गेली होती, त्यानेही सांभाळण्याची जबाबदारी ढकलून दिली

  • Share this:

अहमदनगर, 02 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आता 4 मेपासून सुरू होत आहे. पण, या तिसऱ्या टप्प्यात राज्या-राज्यात अडकलेल्या मजुरांनी आपल्या गावी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. नगरमधील 350 तरुण हे हरियाणामध्ये अडकले आहे. त्यांना सोडवण्याची मागणी केली जात आहे.

हरियाणामधील माणेसरमध्ये मारुती कंपनीच्या प्लंटमध्ये  महाराष्ट्रातील 350 तरुण अडकल्याचं समोर आलं आहे. त्यांना आणण्‍यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी तिथल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

हेही वाचा - लॉकडाउनमध्ये घरी आलेल्या कैद्याला अशीही मदत, कुटुंबीय भारावले

मानेसरमधील (गुडगाव)  मारुती या कंपनीत कंत्राट पद्धतीवर 350 तरुण इंटर्नशीप करण्यासाठी तर काही कामसाठी हरियाणामध्ये गेली होती. 22 मार्च रोजी लॉकडाउन जाहीर झाला. त्यानंतर या तरुणांना कामावरून काढून टाकण्यात आलं.

कामावरून काढून टाकल्यामुळे  हे सर्व तरुण हवालदील झाले होते. त्यांच्याकडे जे काही पैसे होते, त्यावर काही दिवस खर्च भागवता आला. पण, लॉकडाउन वाढल्यानंतर पैसेही संपले आणि परत येण्याचे कोणतेही साधन नव्हते. त्यामुळे या 350 जणांवर उपासमारीची वेळ आली.

हेही वाचा -..तर मोठी किंमत चुकवावी लागेल, शिवसेना खासदारांचा थेट मोदी सरकारला इशारा

या सर्वांचे तिथे खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल झाले. ज्या कंत्राटदाराच्या संपर्कातून ही मुलं हरियाणाला गेली होती, त्यानेही सांभाळण्याची जबाबदारी ढकलून दिली.  त्यामुळे या तरुणांची परिस्थिती अतिशय बिकट झाली. काम नाही, पैसे संपले, यायचे कसे आणि खायचे काय, हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

राज्य सरकारने आम्हाला आपल्या राज्यात परत आणावे अशी याचना या तरुणांनी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपल्या राज्यात जाण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या मुलांना लवकर घरी येता येईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे,वाचा कशी काढाल रक्कम

दरम्यान,  हरियाणा येथे महाराष्ट्रातील काही मुलं हे मारुती कंपनीत इंटर्नशीप करण्यासाठी गेली होती. त्यांनी सरकारसोबत संपर्क केला तर त्यांना महाराष्ट्र आणले जाईल, त्यासाठी पूर्णपणे मदत केली जाईल, असं आश्वासन कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी दिलं.

 

संपादन - सचिन साळवे

First published: May 2, 2020, 5:53 PM IST

ताज्या बातम्या