अमरावती, 02 मे : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. कारागृहातही कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. अशाच कैद्यांसाठी लॉकडाउनच्या परिस्थितीत अमरावतीमध्ये सेवाभावी संस्थांकडून मदत दिली जात आहे. राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता जेलमध्ये असलेल्या कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून राज्य सरकारने राज्यातील जेलमध्ये असलेल्या 38,000 हजार कैद्यांपैकी 11,000 कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुषंगाने त्या कैद्यांना आपल्या घरी जाण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली. हेही वाचा - नवी मुंबईत परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा पुन्हा फज्जा दरम्यान, घरी गेल्यानंतर मात्र, त्या कैद्यांची व त्याच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून कैद्यांसाठी वऱ्हाड संस्थेने पुढाकार घेऊन जवळपास 200 कैद्यांच्या घरपोच अन्नधान्य, किराणा आणि आर्थिक मदत देऊ सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या जामिनावर सोडलेले हे कैदी घरी गेल्यानंतर अनेक कैद्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. त्यातच कोरोनामुळे कामधंदा नसल्याने त्यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये या दृष्टीने वऱ्हाड या संस्थेच्या माध्यमातून त्या कैद्यांना घरपोच किराणा, अन्न धान्य व आर्थिक मदत दिली जात आहे. हेही वाचा - छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा,मोदी सरकारच्या आदेशानंतर या बँकेची मोठी मदत वऱ्हाड संस्थेच्या कार्यालयात काम करणारे 10 लोकं आणि 30 ते 35 स्वयंसेवकांना सोबत घेऊन आतापर्यंत या संस्थेने विदर्भातील 200 कैद्यांना मदत केल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी सांगितलं आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







