मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चिपळूण स्वच्छतेसाठी 2 कोटींची घोषणा, ठाणे-नवी मुंबई पालिकेचे कर्मचारी पोहोचणार मदतीला!

चिपळूण स्वच्छतेसाठी 2 कोटींची घोषणा, ठाणे-नवी मुंबई पालिकेचे कर्मचारी पोहोचणार मदतीला!नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला भेट दिली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला भेट दिली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला भेट दिली.

चिपळूण, 27 जुलै :  रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण (chiplun) शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून शहराच्या स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची घोषणा केली आहे. चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी ठाणे (Thane municipal corporation) आणि नवी मुंबईतील (navi mumbai municipal corporation) स्वच्छता कर्मचारीही मदतीसाठी देणार असून चिपळूणमधील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात येणार आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला भेट दिली. गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; 'ही' आहे नवी तारीख

याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे देखील शिंदे यांनी जाहीर केले आहे.

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळ देखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू असंही त्यांनी जाहीर केलं.

आजीला सांगून स्नेहा किचनमध्ये गेली अन् परत आलीच नाही, देहूरोडमधील दुर्दैवी घटना

चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी महाड मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

शिवसेनेकडून टू व्हीलर दुरुस्तीचा अभिनव उपक्रम

चिपळूण शहरात पुराचे पाणी घुसल्याने या पाण्यात अनेक वाहने वाहून गेली तर काही दुचाकी चिखलात माखल्याने नादुरुस्त झाल्या. अशा दुचाकी विनामूल्य दुरुस्त करून देण्याचा उपक्रम शिवसेनेतर्फे हाती घेण्यात आला आहे. स्थानिक शिवसेना उपविभागप्रमुख बालाजी कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ठाण्यातील नगरसेवक राजेश मोरे यांनी यासाठी लागणारे सारे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. आजच्या दिवसात 15 दुचाकी दुरुस्त करून देण्यात आल्या आहेत.

First published:

Tags: Chiplun, Eknath Shinde