पुणे, 27 जुलै: राज्यात दहावी आणि बारावीप्रमाणेच इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा (5th and 8th Scholarship Exams) घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यानुसार या पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच 5वी (5th Scholarship Exam) आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच 8वीच्या (8th Scholarship Exams) शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख 8 ऑगस्ट 2021 होती. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
याआधी 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख 23 मे 2021 ला जाहीर करण्यात आली होती. यानुसार ही परीक्षा राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेच 8 ऑगस्टला घेण्यात येणार होती मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलून 9 ऑगस्ट 2021 ला होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्रसिद्धीपत्रक जारी करून देण्यात आली आहे.
हे वाचा - CBSE Result 2021: विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण देऊ शकणार नाहीत शाळाहे आहे कारण
8 ऑगस्ट 2021 ला राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे असं या पत्रकात म्हंटलं आहे.
प्रवेशपत्र शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध
9 ऑगस्ट 2021 ला होणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉग इनमध्ये 27 जुलै 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सर्व शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.