आनिस शेख,प्रतिनिधी
मावळ, 27 जुलै : पुणे जिल्ह्यातील (pune) मावळ तालुक्यातील देहूरोडमध्ये (Dehuroad) एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (commits suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील प्रगती कॉलनी विकास नगरमध्येआज दुपारच्या सुमारास घडली आहे. स्नेहा व्हराडे (वय 16) (sneha vharade) असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. स्नेहा आपल्या वयोवृद्ध आजीसोबत राहण्यासाठी विकास नगर येथील प्रगती कॉलनीजवळ दोन खोल्यांच्या घरात राहत होती. मागच्या वर्षीच तिने इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
..तर झाला असता सैफ अली खानचा हाफ मर्डर; करीना कपूर मारणार होती चाकू
आज दुपारच्या सुमारास स्नेहाने घराच्या आतील बाजूस असलेल्या किचनमध्ये घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आतील खोलीत गेलेली स्नेहा बराच वेळ आवाज देऊन सुद्धा दरवाजा खोलून बाहेर येत नसल्याने तिच्या आजीने आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी बोलविले. काही तरुणांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून किचनमध्ये पाहिले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत स्नेहाचा मृतदेह आढळून आला.
पूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता
संबंधित घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. स्नेहाचा मोबाईल तपास करण्यासाठी सोबत घेतला आहे. तसंच, मृतदेह पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. स्नेहाने आत्महत्या का केली हे मात्र, अद्याप कळू शकले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.