मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Selfie बेतली जीवावर; भिवंडीत इमारतीवरुन पडून 13 वर्षीय मुलाने गमावला जीव

Selfie बेतली जीवावर; भिवंडीत इमारतीवरुन पडून 13 वर्षीय मुलाने गमावला जीव

सेल्फीच्या नादात गमावला जीव, इमारतीवरुन पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

सेल्फीच्या नादात गमावला जीव, इमारतीवरुन पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

13 year old child fall from building while clicking selfie: सेल्फी घेताना दुर्घटना घडल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र, तरीही तरुण-तरुणींचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये. आता एका अल्पवयीन मुलाने सेल्फीच्या नादात आपला जीव गमावल्याची घटना भिवंडीत घडली आहे.

पुढे वाचा ...

भिवंडी, 7 डिसेंबर : सेल्फी क्लिक (Selfie) करण्याच्या नादात विविध दुर्घटना झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र, असे असले तरी नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता सेल्फी घेतात. अशाच एक प्रकार भिवंडीत (Bhiwnadi) घडला आहे. सेल्फीच्या नादात एका 13 वर्षीय मुलाने आपला जीव गमावला आहे. सेल्फीच्या नादात इमारतीवरुन पडून त्याचा मृत्यू झाला आहे. (Child died while clicking selfie from building terrace in Bhiwandi)

भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथे ही घटना घडली आहे. या परिसरातील हिना मार्केट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावरून खाली पडल्याने एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद उबेद शेख असे जीव गमावलेल्या मुलाचे नाव आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान सदरची हिना मार्केट ही तळ अधिक दोन मजली इमारत महानगरपालिकेने अनधिकृत ठरवीत कारवाई करीत अर्धवट इमारत तोडून ठेवली आहे. पडीक झालेल्या या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर परिसरातील मुले खेळण्यासाठी जात असून यापूर्वी सुद्धा काही अपघात झाल्याचे बोलले जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद उबेद शेख हा सेल्फी काढण्यासाठी इमारतीच्या छतावर किनारी उभा होता. सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. इमारतीवरुन खाली पडल्याने त्याच्या डोक्यास जबर मार बसला. यातच त्याचा मृत्यू झाला.

वाचा : इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून युक्रेनमधील तरुणीचा मृत्यू, आत्महत्या की घातपात?

सेल्फी घेताना कॅमेऱ्यात 'मृत्यू' कैद

ऑगस्ट महिन्यात अशीच एक घटना घडली होती. आपण स्टार व्हावं, प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी आता सर्वसामान्यांच्या हातात सोशल मीडियाचं माध्यम उपलब्ध झालं आहे. जिथं लोक आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करून फेमस होतात. पण काहीतरी हटके करण्याच्या नादात आपला जीवही गमावतात. अशाच एका सोशल मीडिया स्टारचा सेल्फीच्या नादात मृत्यू झाला. कुबरा डोगन ही टिकटॉक स्टार सेल्फी घेता घेता 160 फूट उंचावरून कोसळली आणि तिने आपला जीव गमावला. धक्कादायक म्हणजे सेल्फी घेताना तिचा हा मृत्यू त्याच कॅमेऱ्यात कैद झाला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो होता.

सेल्फी घेताना वीज कोसळली; 6 जणांचा होरपळून मृत्यू

राजस्थानची राजधानी जयपूर येथे सेल्फी क्लिक करताना एक धक्कादायक घटना घडली होती. सेल्फी क्लिक करणं जीवावर बेतलं असून तब्बल 6 जणांचा एकाच मृत्यू झाला. ही घटना जुलै महिन्यात घडली होती. राजस्थानची राजधानी जयपूर येथील आमेर महल (Aamer Mahal) येथे पर्यटक सेल्फी काढत होते. त्याच दरम्यान अचानक वॉच टॉवरवर वीज कोसळली. वीज कोसळून झालेल्या या दुर्घटनेत तब्बल 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 35 जण जखमी झाले होते.

First published:

Tags: Bhiwandi, Selfie