मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सेल्फी घेताना कॅमेऱ्यात 'मृत्यू' कैद, 160 फूट उंचावरून कोसळली Tiktok star; धडकी भरवणारा VIDEO

सेल्फी घेताना कॅमेऱ्यात 'मृत्यू' कैद, 160 फूट उंचावरून कोसळली Tiktok star; धडकी भरवणारा VIDEO

सेल्फी बेतला जीवावर

सेल्फी बेतला जीवावर

सेल्फी घेत असताना ती धाडकन छतावरून खालीच कोसळली.

  • Published by:  Priya Lad

अंकारा, 24 ऑगस्ट : आपण स्टार व्हावं, प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी आता सर्वसामान्यांच्या हातात सोशल मीडियाचं माध्यम उपलब्ध झालं आहे. जिथं लोक आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करून फेमस होतात. पण काहीतरी हटके कऱण्याच्या नादात आपला जीवही गमावतात. अशाच एका सोशल मीडिया स्टारचा (Social media star) सेल्फीच्या नादात मृत्यू झाला आहे (Tiktok star died while taking selfie) .

कुबरा डोगन ही टिकटॉक स्टार सेल्फी घेता घेता 160 फूट उंचावरून कोसळली आणि तिने आपला जीव गमावला आहे. धक्कादायक म्हणजे सेल्फी घेताना तिचा हा मृत्यू त्याच कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

टर्कीतील हा धक्कादायक व्हिडीओ आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही 23 वर्षांची कुबरा आपली बहीण हेलनच्या घरी गेली होती. तिथं दोघंही आपल्या बिल्डिंगच्या छतावर गेल्या आणि तिथून त्या टिकटॉक व्हिडीओ बनवत होत्या. कुबरा सुरुवातीला वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो काढताना दिसते. फोटोसाठी ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाचते.

हे वाचा - Bikini घालून बीचवर करत होती योगा; तरुणीसोबत असं काही घडलं की पाहून बसेल धक्का

त्यानंतर जसा सूर्य मावळतो, तसं सनसेट रेकॉर्ड करण्यासाठी आणि काही सेल्फी घेण्याचा प्रयत्न त्या करतात. तिची बहीण तिच्याजवळ येते आणि ती सेल्फी घेत असते, तितक्यात कुबरा तिथून अचानक धाडकन खालीच कोसळते. ज्या कॅमेऱ्यात कुबराची बहीण सेल्फी घेत होती, त्याच कॅमेऱ्यात हे भयानक दृश्य रेकॉर्ड झालं.

हे वाचा - फाटक बंद होताना पाहूनही रेल्वे रुळावर गाडी घेऊन गेला अन्...; थरारक VIDEO

कुबरा ज्या छतावर पाय ठेवून बसलेली असते, तिथूनच ती खाली कोसळले. तिने छतावर जिथं पाय ठेवलेला होता, तिथं छत तुटलेलं होतं. तिथं फक्त एक प्लॅस्टिक कव्हर टाकलेलं होतं आणि तिथूनच ती इतक्या उंचावरून खाली कोसळली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Selfie, Tiktok star, Turkey, Viral, Viral videos