जयपूर, 11 जुलै : सेल्फी क्लिक (Selfie) करणं हल्ली खूपच सामान्य झालं आहे. नागरिक जिथं मिळेल तिथं सेल्फी काढण्याचा आपला हट्ट पूर्ण करत असतात. मात्र, आता राजस्थानची राजधानी जयपूर (Jaipur) येथून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. सेल्फी क्लिक करणं जीवावर बेतलं असून तब्बल 6 जणांचा एकाच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानची राजधानी जयपूर येथील आमेर महल (Aamer Mahal) येथे पर्यटक सेल्फी काढत होते. त्याच दरम्यान अचानक वॉच टॉवरवर वीज कोसळली. वीज कोसळून झालेल्या या दुर्घटनेत तब्बल 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 35 जण जखमी झाले असल्याची माहित समोर आली आहे.
सेल्फी घेताना वीज कोसळली; पर्यटकांचा होरपळून मृत्यू तर 35 गंभीर जखमी pic.twitter.com/WMTON6ebA7
— News18Lokmat (@News18lokmat) July 11, 2021
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींपैकी 20 जणांना एसएमएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मोठी बातमी! काशीद बीच समोरील पूल कोसळला; एक कार आणि बाईक गेली वाहून, एकाचा मृत्यू
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने आणि पावसाळ्यामुळे झालेल्या बदलाचा आनंद घेण्यासाठी आमेरच्या टेकड्यावर पर्यंटकांनी गर्दी केली होती. सर्व पर्यटक फोटोग्राफी आणि सेल्फी क्लिक करण्याचे काम करत होते. त्याच दरम्यान मलावर बांधण्यात आलेल्या वॉच टॉवरवर वीज कोसळली.
वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. काही पर्यटक हे चक्क भींतीवरुन खाली कोसळले आणि त्यामुळे ते जखमी झाले आहेत. काही पर्यटक हे अद्याप बेशुद्ध असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.