मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून युक्रेनमधील तरुणीचा मृत्यू, आत्महत्या की घातपात?

Mumbai: इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून युक्रेनमधील तरुणीचा मृत्यू, आत्महत्या की घातपात?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Foreign national died after fall from 12th floor in Mumbai: परदेशी तरुणीचा मुंबईतील इमारतीवरुन पडून मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 25 नोव्हेंबर : एका परदेशी तरुणीचा मुंबई (Mumbai)तील इमारतीवरुन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी (Andheri) परिसरातील ही घटना आहे. मृतक महिला ही युक्रेनची असल्याची माहिती असून तिचे नाव अहनेशा दुब्येना (Ahnesha Dubyna) असे आहे. (Ukrainain girl died after fall from 12th floor building in Mumbai)

अंधेरी परिसरातील डी एन नगर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एसव व्ही मिलेनिअर हेरिटेज या इमारतीच्या 12व्या मजल्यावरुन अहनेशा खाली कोसळली. इमारतीवरुन खाली पडल्याने अहनेशा हिचा मृत्यू झाला. अहनेशा दुब्येना हिने आत्महत्या केली की हा अपघात होता का घातपात होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनची निवासी असलेली अहनेशा दुब्येना ही बिझनेस व्हिसावर मुंबईत आली होती. मुंबईत ती इतर तीन परदेशी नागरिकांसोबत रूम शेअर करत होती. इमारतीवरुन खाली कोसळल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल कऱण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

वाचा : नंदुरबार पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठलं, खतरनाक आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अहनेशा ही किचनमधील खिडकीत बसली होती आणि त्यावेळा ती वाईन सुद्धा घेत होती. तर तिच्यासोबत रूम शेअर करणारे इतर सदस्य हे घरात झोपले होते आणि त्याचवेळा ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच डी एन नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. तसेच अहनेशा हिच्यासोबत रूममध्ये राहणाऱ्या इतर तीन परदेशी नागरिकांचीही पोलीस चौकशी करत आहेत.

वाचा : लेडी डॉक्टरनं मित्रांना दिलं घोड्यांचं इंजेक्शन, मस्ती पडली महागात

भिवंडीत 8 व्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू

भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात अंबिका सिटी तयार करण्यात येत असून इमारत उभारण्याच काम सुरू आहे. मात्र 21 नोव्हेंबर रोजी काम सुरू असताना इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन साईड अभियंता खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आमीन मोहम्मद मुस्‍तकीम अन्सारी (वय 27) असं मयत साईड अभियंताचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर अनुप करनानी यांच्या वतीने उच्चभ्रू अंबिका सिटी सोसायटी बनवण्यात येत आहे. या अंबिका सिटीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिल्म अभिनेता संजय कपूर यांची उपस्थिती देखील पहायला मिळाली होती. मागील 5 वर्षांपासून या ठिकाणी इमारत तयार करण्याचे काम सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai