Home /News /lifestyle /

नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; वेळीच उपचार न केल्यास होतील दुष्परिणाम

नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; वेळीच उपचार न केल्यास होतील दुष्परिणाम

श्वेतप्रदर (white discharge) किंवा पांढरं जाणं हा सुद्धा असा आजार आहे की, महिला त्याबद्दल जास्त बोलत नाहीत किंवा डॉक्टरकडे जाण्यास संकोचतात.

    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : कुटुंबाची काळजी घेताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष (Women Ignore Health Problem) करतात. काही आजार झाले तरी, तात्पूरती औषधं (women Medicine) घेऊन बरं होण्याचा प्रयत्न करतात. पण, काही आजार असे असतात ज्यावर वेळेवर योग्य उपचार (Treatment)झाले नाहीत तर, ते इतके बळावतात की रुग्णालयात दाखल (Hospitalized)करण्याशिवाय पर्याय राहत नाही. श्वेतप्रदर (white discharge disease) हा सुद्धा असा आजार आहे की, महिला त्याबद्दल जास्त बोलत नाहीत किंवा डॉक्टरकडे जाण्यास संकोचतात. या आजारात योनी मार्गामधून (vagina) पांढऱ्या रंगाचा स्त्राव पाझरत राहतो. यालाच अंगावरून पांढरे जाणे असं म्हणतात. याला वैद्यकिय भाषेत ल्युकोरियाही (Lucoria) म्हटलं जातं. पाळी येण्यापूर्वी, संभोगानंतर असा स्त्राव योनीमधून बाहेर येत असते त्यामधून गुप्तांगातील बॅक्टेरिया किंवा डेड स्किन बाहेर टाकली जाते. (युरिक अ‍ॅसिडच्या त्रासात वापरा ‘हे’ गोड औषध; संपेल सगळा त्रास; संशोधकांचा दावा) पांढरं जाणं ही सामान्य गोष्ट असली तरी, त्याचा वास,रंग,स्वरूप आणि प्रमाण यावरून इन्फेक्शनही किंवा आजाराचं लक्षणही ठरू शकतं. पांढर्‍या किंवा दुधी रंगाऐवजी हा स्त्राव पिवळा किंवा हिरवा आढळल्यास. त्याला दुर्गंधी येत असल्यास हे व्हायरल, फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं. तसेच हे लैंगिक आजाराचं लक्षण आहे. (दररोज घ्या Apple Cider Vinegar; एका महिन्यात वजन होईल कमी) श्वेतप्रदर होत असताना वेदना होत असल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करावा. अतिरिक्त प्रमाणात अंगावरून पांढरं जाण्यासोबतच जळजळ होणं, खाज येणं हे गुप्तांगामध्ये इन्फेक्शन असल्याचं लक्षण आहे. संभोग करताना पांढरा स्त्राव जाणे हे ल्युबरिकंट समजलं जातं.पण, त्यावेळी वेदना होणे हे काही समस्या किंवा इंफेक्शनचे संकेत असतात. गर्भाशयाला सुज आल्याने किंवा मुखाला जखम झाल्याने, गर्भपात झाल्याने, गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशयाचा कॅन्सर,गुप्तरोग, अंग बाहेर येणे यानेही श्वेतप्रदर होऊ शकतो. (‘हा’ मित्र कधीच सोडणार नाही साथ; एकटेपणा कायमचा होईल दूर) आजकाल जीवनशैलीमुळे ताण वाढलेला आहे. मानसिक ताणावामुळेही महिंलाना अंगावरून जायला लागतं. योगी मार्गाला खाज सुटणे,आग,जळजळ होणे, स्त्रावाला घाण वास येणे, पिवळा किंवा हिरवा रंग असणे, कंबर, पोट दुखणे. असे त्रास असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय काही घरगुती उपायही करता येऊ शकतात. (15 ऑगस्टपासून लोकल प्रवास होणार सुरू; होऊ नका Coronaचे वाहक, अशी घ्या काळजी) 1. एक चमचा मेथी पावडर आणि एक चमचा गुळ काही दिवस खाल्ल्याने फरक पडतो. 2. 100 ग्रॅम कुळीथ तितक्याच पाण्यात उकळवून त्याचं पाणी प्या. आराम मिळेल. 3.  रात्री 4 अंजिर भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी खाऊन पाणी प्या. 4. दिवसातून 2 वेळा पाण्यामध्ये आवळा पावडर मिसळून प्या. 5. 100 ग्रॅम भेंडी अर्धा लीटर पाण्यामध्ये उकळून निम्म झालेलं पाणी प्या काही दिवसात फरक पडेल. 6. एक ग्लास दुधात अर्धा चमचा तूप आणि केळी कुस्करून मिसळून प्यावं. (गर्भावस्थेत एक गोळी करेल घात; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला) 7. आठवडाभर गुलाब पाकळ्यांची पावडर गरम दुधात मिसळून प्यावी. फरक पडेल. 8. योगी मार्गाची स्वच्छता करा. तुरटीच्या पाण्याने योगीमार्ग धुवा. इन्फेक्शन कमी होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Sexual health, Woman

    पुढील बातम्या