अलीकडच्या काळात यूरिक ॲसिड वाढणं एक गंभीर समस्या (Serious problem) बनली आहे. शरीरात यूरिक ॲसिड वाढलं तर, सांधेदुखीचा त्रास होतो.
|
1/ 11
चुकीचा आहार, मांसाहार, प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खाणं किंवा जास्त वेळ उपाशी राहणं, वाढलेलं वजन आणि डायबेटीस या समस्यांमुळे यूरिक ऍसिड शरीरात वाढू शकतं.
2/ 11
कोल्ड्रिंक्स, सोडा, फ्रेश फ्रूट ज्यूस, ग्लुकोज, रिफाइंड आणि पॅक्ड फूड यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. साधारण वयाच्या तिशीनंतर हा आजार होतो.
3/ 11
यूरिक ऍसिडमुळे ब्लड सर्क्युलेशन कमी होऊन शरीरात गाठी तयार व्हायला लागतात.
4/ 11
यूरिक ऍसिड वाढलं तर सांध्यांमध्ये वेदना व्हायला लागतात. चालणं, उठणं-बसणं देखील कठीण होऊन जातं. यूरिक ऍसिड शरीरात वाढायला लागलं की ते आपल्या संध्यांजवळ जमा व्हायला लागतं.
5/ 11
यूरिक ऍसिड वाढल्यानंतर किडनीवर सर्वात जास्त परिणाम होतो. किडनी डॅमेज होण्याचीही भीती असते. किडनी फंक्शनिंग चुकीच्या पद्धतीने व्हायला लागतं.
6/ 11
आत्ताच समोर आलेल्या एका संशोधनानुसार डार्क चॉकलेट यूरिक ऍसिडवर औषध ठरू शकतं. मात्र डार्क चॉकलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोकोमध्ये ऍन्टिऑक्सिडंट असतात. जे किडनी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
7/ 11
डार्क चॉकलेट सांध्यांवर आलेली सूज कमी करण्यास फायदेशीर आहे. यामध्ये फ्लेवेलॉईड नावाचं एक महत्त्वाचं ऍन्टीऑक्सीडंट आहे. त्यामुळे वेदना आणि सूज कमी करण्यास उपयोगी ठरतं. डार्क चॉकलेट मधील ल्युकोटीएन सांध्यावरील सूज कमी करतं.
8/ 11
सांध्यावर युरेट क्रिस्टल जमा व्हायला लागलं की रुग्णांना जास्त त्रास व्हायला लागतो. अशावेळी डार्क चॉकलेट खावं. डार्क चॉकलेटमध्ये थियाब्रोमाईन नावाचा घटक आहे जो हळूहळू हे क्रिस्टल्स कमी करतो. थियाब्रोमाइन वाढल्याने युरो क्रिस्टल शरीरात जमा होणं थांबतं.
9/ 11
चॉकलेट खाण्याने शरीरात रक्ताभिसरण वाढतं. त्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याची भीती कमी होते.
10/ 11
चॉकलेट मधील ऍन्टिऑक्सिडंट मेंदू सक्रिय होण्यास मदत करतात.त्यामुळे तणाव आणि मूड स्विंग होणं याचा त्रास कमी होतो.
11/ 11
ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि वजनावर देखील डार्क चॉकलेट खाण्याने नियंत्रण येऊ शकतं.