अॅपल सायडर व्हिनेगर हे सफरचंदा पासून बनवलं जातं. सफेद व्हिनेगरपेक्षा अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये व्हिटॅमिन्स आणि ऍन्टिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीराला पोषण मिळतं.
2/ 8
सॅलड, एखाद्या ड्रिंकमद्ये अॅपल सायडर व्हिनेगर घालून घेऊ शकता. अनेक पदार्थांमध्ये ऍप्पल सायडर व्हिनेगर वापरलं जातं. यामुळे आपलं वजन कमी होऊ शकतं.
3/ 8
शरीरामध्ये चरबी वाढल्याने वजन वाढायला लागतं. अॅपल सायडर व्हिनेगर शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्याचं काम करतं. संशोधनानुसार अॅपल सायडर व्हिनेगर वाढलेली चरबी नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर आहे.
4/ 8
अॅपल सायडर व्हिनेगर घेतल्याने लवकर भूक लागत नाही. अॅपल सायडर व्हिनेगर मधील अॅसिड भूक मंदावतं. त्यामुळे बराच काळ आपल्याला भूक लागल्या सारखं वाटत नाही. जास्त खाण्यामुळे वजन वाढतं. भुकेवर नियंत्रण राहिल्यामुळे आपोआपच वजन कमी व्हायला लागतं.
5/ 8
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्याची क्षमता आहे. शरीरात शुगर लेव्हल वाढल्याने देखील वजन वाढायला सुरुवात होते. रक्तातली साखर कमी करायची असेल तर, अॅपल सायडर व्हिनेगर. अॅपल सायडर व्हिनेगर इन्सुलिन वाढण्यात मदत करतं.
6/ 8
1 ग्लास पाण्यामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर रोज रिकाम्या पोटाने घ्यावं. दररोज सकाळी 2 चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, लिंबाचा रस, एक चमचा मध आणि सैंधव मीठ मिक्स करून प्यावं. हा उपाय रात्रीच्या जेवणाआधी देखील करता येतो. यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत मिळेल.
7/ 8
अॅपल सायडर व्हिनेगर अनेक प्रकाराने फायदेशीर आहे. अॅपल सायडर व्हिनेगर वजन कमी करतं, यूटीआय, अर्थराइटिस सारख्या त्रासांमध्ये देखील मदत करतं. ऍसिडिटी ॲसिड रिफ्लेक्शन कमी करण्यास देखील फायदेशीर आहे.
8/ 8
ज्यांना सांधे दुखण्याचा त्रास आहे, गुडघेदुखी आहे त्यांनाही फायदेशीर आहे अॅपल सायडर व्हिनेगरमुळे शरीरातील पीएच लेव्हल योग्य राहते. अंगदुखीचा त्रास असेल तर, कमी होतो. याशिवाय पचन क्षमता चांगली होते.