जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अंडरवर्ल्डमध्ये खून करण्यासाठी सुपारी शब्दाचा वापर का केला जातो? रंजक आहे यामागची कथा

अंडरवर्ल्डमध्ये खून करण्यासाठी सुपारी शब्दाचा वापर का केला जातो? रंजक आहे यामागची कथा

अंडरवर्ल्डमध्ये खून करण्यासाठी सुपारी शब्दाचा वापर का केला जातो? रंजक आहे यामागची कथा

जेव्हा एखाद्या गोष्टीवर सहमती होते किंवा डील पक्की होते तेव्हा ‘कामाची सुपारी आली आहे’ असं मराठीत म्हटलं जातं. याचा अर्थ आम्हाला कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 02 फेब्रुवारी: तुम्हाला सुपारी (Supari) माहितीये का?, ती खाण्यासाठी वापरली जाणारी सुपारी नाही. आम्ही बोलतोय अंडरवर्ल्ड (Underworld) किंवा गुन्हेगारी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सुपारी या शब्दाबद्दल. सुपारी ही कॉन्सेप्ट आपल्याला खरं तर चित्रपटांमधून (Cinema) ओळखीची झाली. अमुक एखाद्याने तमुक एखाद्याला मारण्यासाठी सुपारी दिली किंवा घेतली, असे डायलॉग चित्रपटात तुम्हीही ऐकले असतील. ही सुपारी म्हणजे काय?, तर एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट (contract). पण खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुपारीचं नाव अंडरवर्ल्डमध्ये इतकं नकारात्मक कसं वापरलं जाऊ लागलं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? प्रश्न पडला असेल आणि त्याचं उत्तर मिळालं नसेल तर ही बातमी नक्की वाचा. खरं तर या सुपारी शब्दामागे मोठी कहाणी आहे. सुपारी या शब्दाचा अर्थ फक्त कॉन्ट्रॅक्ट किलिंग (Contract Killing) असा होतं नाही. तर, डील पक्की झाली किंवा एखाद्या कामासाठी टोकन रक्कम दिली जात असेल तरी सुपारी हा शब्द वापरला जातो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांचे निवृत्त एसीपी वसंत ढोबळे सांगतात की, महाराष्ट्रात (Maharashtra) कोणत्याही पाहुण्याला (guest) आमंत्रित करण्यासाठी पान आणि सुपारी दिली जाते. यासोबतच सुपारी हा शब्द कोणत्याही डील किंवा कॉन्ट्रॅक्टसाठी वापरला जातो. यासंदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.

    आता आईच्या गर्भाशयाशिवायच जन्माला येणार बाळ; रोबो निभावणार मोठी भूमिका

    जेव्हा एखाद्या गोष्टीवर सहमती होते किंवा डील पक्की होते तेव्हा ‘कामाची सुपारी आली आहे’ असं मराठीत म्हटलं जातं. याचा अर्थ आम्हाला कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. म्हणून महाराष्ट्रामुळे चित्रपटांमध्ये सुपारी शब्द जास्त प्रचलित आहे. अंडरवर्ल्डमधील सुपारी या शब्दाचा वापर चित्रपटांमध्ये मर्डरशी जोडलेला दाखवला जातो. सुपारी हा शब्द वापरण्यामागे इतिहासदेखील (History of Supari) आहे. ‘Dongri to Dubai: Six Decades of the Mumbai Mafia’ या पुस्तकाचे लेखक एस. हुसैन झैदी यांनी पुस्तकात सुपारी शब्द वापरण्यामागचा इतिहास सांगितला आहे. माहेमी जमातीचे प्रमुख भीम यांच्या परंपरेमुळे सुपारी हा शब्द प्रचलित झाल्याचे सांगण्यात आले आहे. पुस्तकानुसार भीम यांच्या समोर जेव्हा केव्हा कठीण काम असायचे तेव्हा ते योद्ध्यांची सभा बोलावत आणि त्यानंतर ताटलीमध्ये सुपारी किंवा पान ठेवत असत. आता जो कोणी ही पान किंवा सुपारी उचलायचा, त्याला ते काम करावं लागायचं. यावरून पान किंवा सुपारी देऊन डील किंवा कॉन्ट्रॅक्ट झाल्याचे दिसून यायचं. यानंतर सुपारीचा हा ट्रेंड सुरू झाला होता.

    सावधान! या अशा कलरफुल कबुतरांना भुलू नका…; तज्ज्ञांचा इशारा

    असं म्हटलं जातं की आजकाल सुपारी घेण्याचा ट्रेंड फार कमी झालाय. चित्रपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे हा ट्रेंड तेवढ्या प्रमाणात नाही. तर, ही होती गुन्हेगारी दुनियेत सुपारी शब्दाचा वापर का आणि कसा सुरू झाला याची कहाणी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात