जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सावधान! या अशा कलरफुल कबुतरांना भुलू नका...; तज्ज्ञांचा इशारा

सावधान! या अशा कलरफुल कबुतरांना भुलू नका...; तज्ज्ञांचा इशारा

सावधान! या अशा कलरफुल कबुतरांना भुलू नका...; तज्ज्ञांचा इशारा

अशा रंगीबेरंगी कबुतरांना घरी नेण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा.

  • -MIN READ
  • Last Updated :

क्वालालांपूर, 01 फेब्रुवारी : जगात असे बरेच प्राणी-पक्षी आहेत जे काही खास गोष्टींमुळे चर्चेत येतात. सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे ते कलरफूल कबुतर. कबूतर म्हटलं ती सामान्यपणे पांढरे किंवा काळे कबूतर तुम्ही पाहिले असतील. पण आता या रंगीबेरंगी कबुतरांनी (Colorful rainbow) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या इंद्रधनुषी कबुतराला (Rainbow Pigeon) आपल्या घरी नेण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. पण या कबुतरांना भुलू नका, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मलेशियात रस्त्यावर असे रंगीत कबूतर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पोपटाप्रमाणे पिंजऱ्यात बंद करून या कबुतरांना विकलं जातं आहे. असं कबूतर कधीच पाहिलं नसल्याने हे कबूतर सर्वांना आकर्षित करून घेत आहेत. त्यामुळे लोक त्याला चमत्कार समजून आपल्या घरी घेऊन जात आहेत. या कबुतरांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. जे पाहताच तज्ज्ञांनी ग्राहकांना सावध केलं आहे. हे वाचा -  बापरे! मजेत तरुणाने सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकला आणि…; थरकाप उडवणारा VIDEO हे कबूतर इंद्रधनुषी नाहीत. त्यांच्यावर कलर स्प्रे करण्यात आला आहे. कबुतरांना असा रंग दिल्याने त्यांची विक्री वाढली आणि त्याच्याकडे बराच पैसा आला असं या विक्रेत्याने सांगितलं.

जाहिरात

dr.ima_vet ट्विटर अकाऊंटवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार हे रंगीत कबूतर पर्यावरणासाठी चिंताजनक आहे. ज्या कबुतरांना तुम्ही कलरफूल समजून आपल्या घरी नेत आहात, ते खरंतर मुक्या जीवांसोबतची क्रूरता आहे.  प्राण्यांच्या छळाची ही खतरनाक पद्धत आहे. हे वाचा -  ‘माझा श्वास गुदरमतोय’, ब्रेस्टला वैतागली महिला; लोकांसमोर मदतीसाठी पसरले हात मला क्षमा करा पण ही मजेशीर गोष्ट नाही. रंगीत कबुतरं विकून पैसे कमवणं क्रूर आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा असे कबूतर खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात