• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Kiss करताना का बंद होतात डोळे? तज्ज्ञांनी उलगडलं 'लिपलॉक' मागील रहस्य

Kiss करताना का बंद होतात डोळे? तज्ज्ञांनी उलगडलं 'लिपलॉक' मागील रहस्य

तुम्ही कितीही बिनधास्त असला तरी किस (Kiss) करताना ठरवूनही डोळे उघडे ठेवणं तुमच्यासाठी (eyes closed while kissing) शक्य होत नाही.

 • Share this:
  ब्रिटन, 28 मे : शारीरिक संबंध (Physical relation) ठेवताना बहुतेकदा स्त्रिया थोड्या घाबरलेल्या असतात. म्हणजे त्या पुरुषांप्रमाणे बिनधास्त नसतात. पण किस (Kiss) करताना एक गोष्ट मात्र तुमच्या लक्षात आली असेल. जेव्हा कपल एकमेकांना किस (Kissing) करतात, विशेषतः ओठांना किस करतात तेव्हा फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषांचेही डोळे बंद (Why eyes closed while kissing) होतात. यामागे नेमकं कारण काय आहे? किस करताना डोळे बंद होण्याचं नेमकं काय रहस्य आहे, याचा उलगडा मानसशास्त्रज्ञांनी केला आहे. लंडनच्या रॉयल होलोवे युनिव्हर्सिटीच्या शास्त्रत्रांनी दृष्टी आणि स्पर्श यावर संशोधन केलं. त्यावेळी या प्रश्नाचंही त्यांना उत्तर मिळालं. जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल साइकोलॉजीमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. हे वाचा - कोरोनामुळे लैंगिक जीवनावर होतोय परिणाम? संशोधन काय सांगतं वाचा.. Independent ने या संशोधनाबाबत दिलेल्या वृत्तानुसार किसबाबत झालेल्या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना काही टास्क देण्यात आले. म्हणजेच किस करताना त्यांना दुसरं कामही देण्यात आलं. पण त्यांना हे काम करण्यात अडचण येऊ लागली. या लोकांची सेंस ऑप टच म्हणजेच स्पर्श अनुभवण्याची भावना कमी होती कारण त्यांचे डोळे काम करत होते.तज्ज्ञांच्या मते, किस करताना मेंदूला दुसऱ्या कार्यावर लक्ष्य केंद्रीत करणं अशक्य होतं. आपण जे काम करत आहोत, त्यावर लक्ष केंद्रीत करावं असा सिग्नल मेंदूला सांगितलं जातं. त्यामुळे डोळे आपोआप बंद होतात. हे वाचा - 150 वर्ष जगण्यासाठी काय करावं? शास्त्रज्ञांनी केलेला दावा ऐकून व्हाल थक्क मानसशास्त्रज्ञ पोली डाल्टन आणि सँड्रा मर्फी यांना दिसून आलं आहे. सेंस ऑफ टच एकमेकांजवळ असण्याची भावना निर्माण करतं. किसमार्फत लोक आपल्या पार्टनरला साथ आणि सुरक्षेची भावना देण्याचा प्रयत्न करतात. डोळे बंद करून ते पूर्णपणे एकमेकांमध्ये गुंततात. पण जर डोळे उघडे असतील तर मग त्यांचं लक्ष विचलित होतं. किस, सेक्स करताना लोकांना आपलं लक्ष विचलित करायचं नसतं. त्यामुळेच अशावेळी लोक डोळे बंद ठेवून स्पर्शावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतात.
  Published by:Priya Lad
  First published: