Home /News /lifestyle /

कोरोनामुळे लैंगिक जीवनावर होतोय परिणाम? संशोधन काय सांगतं वाचा..

कोरोनामुळे लैंगिक जीवनावर होतोय परिणाम? संशोधन काय सांगतं वाचा..

Coronavirus माणसाच्या लैंगिक जीवनावर देखील परिणाम करीत असल्याचं या संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. भारतातले डॉक्टर काय सांगतात याविषयी...

सीमांतिनी डे नवी दिल्ली, 25 मे : कोरोना (Coronaviurs) संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या खतरनाक विषाणूचा परिणाम केवळ माणसाच्या फुफ्फुसांवरच नाही तर अन्य अवयवांवर देखील होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांना दीर्घकाळ रुग्णालयात उपचार आणि तपासणीसाठी जावं लागते. या विषाणूचा फुफ्फुसांव्यतरिक्त हृदय, किडनी, आणि पित्ताशयालादेखील फटका बसतो. नुकताच जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर अनेक प्रकारे संशोधन करण्यात आले. हा विषाणू माणसाच्या लैंगिक जीवनावर (effect of covid-19 on Sex Life) देखील परिणाम करीत असल्याचं या संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. हा विषाणू माणसाच्या लैंगिक जीवनावर (Coronavirus sex life) कशा प्रकारे परिणाम करतो, याबाबत यंदाच्या मार्च महिन्यात संशोधनाचे निष्कर्ष स्पष्ट झाले होते. यानुसार, ज्या पुरुषांना कोरोनाचा संसर्ग होतो, ते पुरुष इरेक्टाईल डिस्फंक्शनची (erectile dysfunction) तक्रार करताना दिसून येत आहेत. या आजाराला भारतातील सर्वसाधारण बोली भाषेत नपुंसकता असं म्हणतात. या लोकांना सेक्स दरम्यान इरेक्शन होत नसल्याचं दिसून येतं. संशोधन काय सांगतं नुकतेच इटलीमध्ये याबाबत संशोधन करण्यात आले. कोरोना विषाणू माणसांची कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीम (Cardiovascular System) उध्वस्त करुन टाकतो. कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीमच्या माध्यमातून मानवी शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यामुळेच पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या निर्माण होत असल्याचे संशोधन सांगते. ना कोणती लस, ना औषध! Whisky पिऊन लोकांनी महासाथीशी दिला लढा वर्ल्ड जर्नल ऑफ मेन्स हेल्थ या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यास असं सांगण्यात आलं आहे की संसर्गाच्या सुरुवातीच्या काळानंतर हा विषाणू दिर्घकाळ पुरुषांच्या जननेंद्रियात अस्तित्वात राहतो. त्यामुळे देखील इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या निर्माण होऊ शकते. भारतातील डॉक्टर काय सांगतात परंतु, भारतात अशा प्रकारचे संशोधन झालेले नाही. परंतु, कोरोनातून बरे झालेले रुग्ण अशा प्रकारची समस्या घेऊन डॉक्टरांकडे येत असल्याचे दिसते. डिएनबी युरोलॉजिस्ट एस.एस.वासन यांनी न्यूज 18 ला सांगितलं की माझ्याकडे आतापर्यंत अशी समस्या घेऊन 8 ते 9 रुग्ण आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या जाणवत होती. मात्र कोरोनामुळेच ही समस्या उद्भवत असल्याचं आम्ही ठोसपणे सांगू शकत नाही. DOG ही सांगू शकतो तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; काही सेकंदातच करतो निदान इरेक्टाइल डिस्फंक्शन हे कोरोनामुळे होते, हे सिध्द करण्यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. आतापर्यंत आम्ही प्रश्नांवर आधारित अभ्यास पाहिला आहे. परंतु, आम्हाला अधिक ठोस वैज्ञानिक पुराव्यांची गरज आहे. साथीचा सेक्स लाईफवर प्रतिकूल परिणाम दिल्ली येथील एंड्रोलॉजिस्ट डॉ. गौतम बंगा यांनी न्यूज 18ला सांगितलं की ही महामारी अनेक समस्या घेऊन आली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लोकांना अर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. जवळच्या व्यक्ती गमवणं आणि एकटेपणा यासारख्या समस्यांमुळे अनेकांना इरेक्टाइल डिस्फंक्शन चा सामना करावा लागत आहे. माझ्या अनुभवानुसार कोरोनामुळे 20 ते 30 वयोगटातील लोकांच्या सेक्स लाईफवर विपरित परिणाम झाला आहे. सोशल नसल्याने सिंगल लोकांना सेक्ससाठी पार्टनर मिळत नसल्याचे वास्तव आहे. जे लोक विवाहित आहेत ते वर्क फ्रॉम होममुळे (Work From Home) खूप दबावात आहेत. हे लोक दीर्घकाळ कामात व्यस्त राहत असल्याने सेक्स करु शकत नसल्याचे दिसून येते.
First published:

Tags: Coronavirus, Sexual wellness

पुढील बातम्या