नवी दिल्ली, 12 मे : उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे फायदे कोणाला परत सांगण्याची गरज नाही. आयुर्वेदाव्यतिरिक्त युनानी आणि चायनीज औषधांमध्येही जांभूळ खाण्याचे फायदे सांगितले आहेत. जांभूळ खाऊन आपण सहसा त्याच्या बिया फेकून देतो. मात्र, या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. जांभळाच्या बिया रक्तातील वाढत्या रक्तातील साखरेवर सहज नियंत्रण ठेवू शकतात, अशी माहिती
आज तकने दिली आहे.
जांबोलिन आणि जॅम्बोसिन नावाचे घटक जांभूळ आणि त्याच्या बियांमध्ये आढळतात, ज्यामुळे रक्तात तयार होणाऱ्या साखरेचा वेग कमी होतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढते. याचे नियमित सेवन केल्यास मधुमेहाचा आजार वाढण्यापासून रोखता येतो.
आयुर्वेदाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय जांभळामध्ये एस्ट्रीन्जेंट आणि एंटी-ड्यूरेटिकसारखे गुणधर्म असतात, ज्यामुळे वारंवार लघवी येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय यात हायपोग्लाइसेमिक गुणधर्म देखील असतात, जे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी करतात. जांभळाच्या बियांमध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आढळतात असा तज्ञांचा दावा आहे.
जांभळाच्या बिया कशा वापरायच्या?
जांभूळ खाल्ल्यानंतर त्याच्या बिया स्वच्छ भांड्यात साठवा. या बिया नीट धुऊन झाल्यावर स्वच्छ कापडावर सुकवायला सोडा. त्यांना सूर्यप्रकाशात व्यवस्थित सुकायला किमान तीन ते चार दिवस लागतील.
हे वाचा -
Hair Care Tips: एका आठवड्यात केस कितीवेळा धुवावेत? अनेकजण इथंच चूक करतात
बिया सुकवल्यानंतर त्यांचा वरचा थर म्हणजे साल काढून आतील हिरवा भाग ठेवा. या बियांचे दोन भाग करा आणि त्यांना आणखी काही दिवस सुकविण्यासाठी सोडा जेणेकरून बिया व्यवस्थित सुकतील. यानंतर वाळलेल्या बिया मिक्सरमध्ये बारीक करा. बियांपासून तयार केलेली ही पावडर एका बॉक्समध्ये ठेवा आणि गरज असेल तेव्हा वापरा.
हे वाचा -
आर्थिक चणचण, अनंत अडचणी दूर करण्यासाठी तुळशीचा असा करतात उपयोग
कशी खाल -
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात एक चमचा जांभळाच्या बियांची पावडर मिसळून प्या. यामुळे तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहील. मात्र, प्रत्येक मधुमेही रुग्णांची स्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे हा उपाय करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास चांगले होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.