नवी दिल्ली, 11 मे : कोणत्याही नात्यात प्रेम, विश्वास आणि विश्वासासोबतच इंटिमेसी असणं खूप गरजेचे असतं. इंटिमेसीमुळे नातं अधिक घट्ट होतं. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या लैंगिक जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यामागे आपल्या काही सवयी कारणीभूत आहेत. जाणून घेऊया अशा सवयींबद्दल ज्यांचा आपल्या लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होतो.
चुकीच्या गोष्टी खाणे-
आज तकने दिलेल्या बातमीनुसार, जास्त जंक फूड्स खात असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या शरीरात कार्ब, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स भरत आहात. यामुळे रक्तप्रवाह अतिशय मंद होतो, या पदार्थांचे अतिसेवन केल्यानं सेक्स परफॉर्मेंसवर वाईट परिणाम होतो. या गोष्टींऐवजी तुम्ही फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. सकस पदार्थ खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
जास्त मीठ खाणे -
दररोज जास्त मीठ वापरलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे कामवासना कमी होऊ शकते. बर्याच पाकिट बंद केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते खाणे टाळा.
नेहमी तणावात राहणं-
जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे बराच काळ त्रस्त असाल-तणावात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतोच. शिवाय जवळीक साधण्याची इच्छाही कमी होते. जर तुम्हाला लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर तणावापासून दूर राहा आणि तुमचा ताण घेण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडवा.
हे वाचा - प्रवासात उलटीचा त्रास होईलच कसा? या 3 गोष्टी तुमचं टेन्शन घालवतील
एकमेकांशी मोकळेपणाने नं बोलणं -
जर तुम्हाला तुमच्या सेक्स लाईफशी संबंधित एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा तुमच्याकडे त्यात सुधारणा करण्याच्या कल्पना असतील तर त्याबद्दल तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला. जर तुम्ही त्याबद्दल बोलण्यास संकोच करत असाल तर त्याचा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज होतो.
हे वाचा - टेन्शन नॉट! आता आंबे खरेदी करताना होणार नाही फसवणूक; या 2 गोष्टी ध्यानात ठेवा
वाढलेलं वजन -
जर तुम्हाला लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर तुमचे वाढलेले वजन कमी करणे महत्त्वाचे आहे. जास्त वजनामुळे तुमच्या सेक्स कामगिरीवर वाईट परिणाम होतो. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत एका अभ्यासातून समोर आले आहे की, ज्या पुरुषांची कंबर 40 इंचांपेक्षा जास्त आहे, त्यांना नपुंसकतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual health, Sexual wellness