पेनसिल्व्हेनिया, 04 फेब्रुवारी: या महिन्यात व्हेलेंटाईन वीक (Valentine Week 2022) सुरू झाला की, सगळीकडं प्रेमाचे वारे वाहू लागतात. प्रेमात असलेली जोडपी एकमेकांसाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आसपासचा प्रेमाचा माहौल पाहून प्रेमभंग झालेले लोकसुद्धा भूतकाळातील आठवणींमध्ये गुंतलेले दिसतात. काहींची तर इच्छा असूनदेखील पास्ट रिलेशनशीपमधून (Past Relationships) त्यांना मूव्ह ऑन (How to Move On) होता येत नाही. काहींना आपल्या ‘एक्स’बद्दल म्हणजे आधीच्या जोडीदाराबद्दल मनात राग असूनही तो त्यांना व्यक्त करता येत नाही. अशांसाठी पेनसिल्व्हेनियामधील लिहाई व्हॅली झूसारख्या (Lehigh Valley Zoo) काही प्राणीसंग्रहालयांनी अनोखी कल्पना समोर आणली आहे. या झूमध्ये तुम्ही तुमच्या एक्सच्या नावाचा कीडा पाळू शकता! यासाठी प्राणीसंग्रहालयात पाच डॉलर्सचं डोनेशन घेतलं जाणार आहे (374 रुपये). तुमच्या एक्सच्या नावाचा कीडा प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना खाऊ घातला जाईल. या माध्यमातून झू तुम्हाला तुमच्या पास्ट रिलेशनशीपच्या आठवणींमधून बाहेर पडण्यास मदत करणार आहे. हे वाचा- सातव्या महिन्यातच बाळाला जन्म दिला आणि लगेच नोकरीवर गेली आई; संतापजनक आहे कारण लिहाई झूनं या वर्षीच्या व्हेलेंटाईन डेसाठी त्यांच्या ट्विटर पेजवर एक खास ऑफरसह जाहिरात केली आहे. झूनं जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, ‘किड्याला तुमच्या एक्सचं नाव द्या आणि आम्ही ते आमच्या प्राण्यांना खायला घालू!’ किड्याला एक्सचं नाव देण्यासाठी 364 रुपये आकारले जातील. हे पैसे नंतर एखाद्या प्राण्याच्या संगोपनासाठी वापरले जातील, असंही जाहिरातीत सांगण्यात आलं आहे.
We get it—sometimes love sucks. So instead of feeling down love may not last forever, put a twist on Valentine’s Day and name a bug after your ex! Make a $5 donation today to name one of our feeder crickets and we'll feed it to our ambassador animals! https://t.co/Yl7PvkgTLi pic.twitter.com/taQvv9Qt9T
— Lehigh Valley Zoo (@LVZoo) January 25, 2022
लिहाई प्राणीसंग्रहालयाच्या वेबसाइटनुसार, हे प्राणीसंग्रहालय फेसबुक पेजवर विकली व्हिडीओदेखील पोस्ट करणार आहे. या व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या एक्सच्या नावाचा कीडा प्राण्यांना खाऊ घातला जाताना पाहू शकतील. दरम्यान, सॅन अँटोनियो झूलॉजिकल सोसायटीनंसुद्धा (San Antonio Zoological Society) असाच काहीसा उपक्रम सुरू केला आहे. या ठिकाणी ‘क्राय मी अ कॉकरोच’ (Cry Me a Cockroach) इव्हेंटमध्ये लोकं झुरळ किंवा उंदराना त्यांच्या एक्स नाव ठेवू शकतात. दरवर्षी प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला हा कार्यक्रम आयोजित केला जातो. झूलॉजिकल सोसायटी यासाठी लोकांना आमंत्रित करते. या वर्षी देखील, झूलॉजिकल सोसायटीनं त्यांच्या ट्विटर पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे कार्यक्रमाची जाहिरात केली आहे. ‘आजच डोनेशन द्या. आम्ही तुमच्या एक्सला प्राण्यांच्या तोंडी देऊ आणि तुम्हाला व्हिडीओ आणि प्रमाणपत्र पाठवू,’ अशी जाहिरात सोसायटीनं केली आहे.
This Valentine's Day, name an ex after a cockroach, rodent, or veggie as part of our annual, worldwide, Cry Me a Cockroach Fundraiser!
— San Antonio Zoological Society 🦍 (@SanAntonioZoo) January 18, 2022
Donate today, and we'll feed your "ex" to one of the animals and send YOU the video, plus a certificate!
जाहिरातीमध्ये दिलेल्या व्हिडीओमध्ये हिप्पोपोटॅमस (hippopotamus), मॉनिटर सरडा (monitor lizard) यांसारख्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या क्लिप आहेत. त्यांना एक्सची नाव असलेले उंदीर आणि कीटक खायला दिले जात असल्याचं व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातील लोक वेबसाइटद्वारे या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात आणि या अनोख्या पद्धतीनं त्यांच्या साचलेल्या भावना मोकळ्या करू शकतात. हे वाचा- ज्या टोपीमार्फत उडवली महिलेची खिल्ली, तीच तिच्यासाठी ठरली लकी; मिळाले 20 कोटी पण, जर अशा पद्धतीनं किड्याला एक्सचं नाव देणं व तो कीडा प्राण्यांना खाऊ घालताना पाहणं तुम्हाला जास्त क्रूर वाटत असेल तर एक मधला मार्गसुद्धा प्राणीसंग्रहालयांनी काढला आहे. या व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला चायेन माउंटन झूमध्ये (Cheyenne Mountain Zoo) प्राणी दत्तक (adopt ) घेऊन त्याला एक्सचं नाव देऊ शकता. यासाठी चायेन झूनं माउंटन लायन्सला दत्तक घेण्यासाठी लोकांना आमंत्रित केलं आहे. प्राणिसंग्रहालयाच्या वेबसाइटनुसार, दत्तक प्रक्रियेतून जमा झालेल्या डोनेशनचा वापर प्राणीसंग्रहालयातील सिंहाच्या संगोपनासाठी केला जाणार आहे.