जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ज्या टोपीमार्फत उडवली तिची खिल्ली, तीच तिच्यासाठी ठरली लकी; महिलेला मिळाले 20 कोटी

ज्या टोपीमार्फत उडवली तिची खिल्ली, तीच तिच्यासाठी ठरली लकी; महिलेला मिळाले 20 कोटी

ज्या टोपीमार्फत उडवली तिची खिल्ली, तीच तिच्यासाठी ठरली लकी; महिलेला मिळाले 20 कोटी

एक टोपी तिच्यासाठी ठरली लकी नेमकं काय आहे हे प्रकरण वाचा सविस्तर.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 02 फेब्रुवारी :  शाळा असो, कॉलेज असो किंवा ऑफिस… प्रत्येक ठिकाणी थोडीफार मजामस्तीही होतेच. काही वेळा एका विशिष्ट व्यक्तीला वारंवार टार्गेट केलं जातं आणि मग मस्करीची कुस्करी होते. सध्या यूकेतील असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिला बँकरची खिल्ली उडवली आणि हे प्रकरण बँकेला चांगलंच भोवलं (Witch hat on desk city banker wins 20 crore rupees). पश्चिम लंडनच्या फुलहममध्ये राहणारी 50 वर्षांची स्टेसी मॅकन. 2013 साली तिला BNP Paribas मध्ये नोकरी देण्यात आली. त्याच बँक प्रशासनाविरोधात तिने केस केली. लंडनच्या सेंट्रल ट्रिब्यूनलमध्ये याबाबत सुनावणी झाली. तिला भरपाई म्हणून 20 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. मेट्रोच्या रिपोर्टनुसार बँकेचा मालक तिला सतत आता नाही स्टेसी असं म्हणायचा. त्यानंतर बँकेतील इतर कर्मचारीही तिला असंच बोलू लागले. शिवाय तिच्याप्रमाणेच पोझिशन असलेल्या आणि तिच्याइतकीच जबाबदारी असलेल्या पुरुष सहकाऱ्याला 40 लाख रुपये जास्त पगार देण्यात आला. चार वर्षांत बोनस म्हणून त्या पुरुषाला 1.67 कोटी रुपये मिळाले. पण स्टेसीला फक्त 33 लाख रुपये देण्यात आले. हे वाचा -  पहिल्या प्रसूतीनंतर 8 व्या महिन्यातच झालं दुसरं बाळ; प्रेग्न्सीमुळे महिला शॉक मॅकेनने याबाबत बँक प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली पण काहीच हालचाल झाली नाही. अखेर वेतन आणि पगारावरून तिने बँकेलाच ट्रिब्यूनलमध्ये खेचलं. भरपाई म्हणून बँकेवर तिने 40 कोटी रुपयांचा दावा ठोकला. तिच्यासोबत भेदभाव केल्याचा आरोप तिने केला आहे. ज्यामध्ये तिने चुडैलच्या टोपीचा उल्लेख केला आहे. मॅकेनच्या मालकांपैकी एक मॅट पिन्नॉक यांच्या माजी पीए जॉर्जीना चॅपमॅनने आपल्या साक्षीत त्या घटनेबाबत सविस्तर सांगितलं.  चॅपमॅन यांनी सांगितलं, ऑक्टोबर 2013 मध्ये पिन्नॉकसह काही प्रमुख ब्रोकरेज टीममधील लोकांनी संध्याकाळी पबमध्ये दारू प्यायल्यानंतर स्टेसी मॅकेनच्या टेबलवर एक मोठी हॅलोवीनसारखी चुडैलची टोपी ठेवली होती. हे वाचा -  ‘माझा श्वास गुदरमतोय’, ब्रेस्टला वैतागली महिला; लोकांसमोर मदतीसाठी पसरले हात ट्रिब्यूनलच्या एका रिपोर्टमध्ये मॅकेनबाबत सांगण्यात आलं की, तिने आपल्या आयुष्यात बँकिंगमध्ये आपल्या 22 वर्षांच्या करिअरला प्राथमिकता दिली. करिअरसाठी तिने लग्न, मुलांचाही विचार सोडला. आपल्या कामातच तिला आनंद शोधला आणि ते पूर्णही केलं. फिटनेसशिवाय तिला दुसरा कोणताच छंदही नाही. यानंतर ब्रिटिश ट्रिब्यूनलने मॅकेनला भरपाई देण्याचे आदेश बँकेला दिले. त्यानंतर तिला 20 कोटी 81 लाख 449 रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात