वॉशिंग्टन, 03 फेब्रुवारी : बाळाला जन्म दिल्यानंतर एका महिलेची शारीरिक आणि मानसिक अवस्था काय असते, एका आईसाठी तिचं मूल काय असतं हे कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. असं असताना एका महिलेला मात्र प्रिमॅच्युअर बाळाला जन्मानंतरच सोडून नोकरीवर जाण्याची वेळ ओढावली आहे (After baby birth mother return to job). याचं कारण धक्कादायक आहे. जे वाचून तुमचाही संताप होईल. अमेरिकेतील एका आईने आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे. @edensmomma10_12 टिकटॉक युझरने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. सातव्या महिन्यातच तिची मुलगी जन्माला आली. तिला NICU मध्ये ठेवण्यात आलं आहे. पण काळजावर दगड ठेवून तिला आपल्या या इवल्याशा चिमुकलीपासून तिच्या जन्मानंतर बाराव्या दिवशीच दूर होत नोकरीवर जावं लागतं आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रेग्नंट महिला, नवमाता यांना मॅटर्निटी लिव्ह म्हणजे प्रसूती रजा मिळते. भारतात 6 महिन्यांच्या प्रसूती रजेसह पगारही दिला जातो. तसंच या कालावधीत महिलेला नोकरीवरून काढल्यास कठोर कारवाई केली जाते. पण भारतासारख्या विकसनशील देशात माता आणि नवमातांसठी जसे सुरक्षित, चांगले कायदे आहेत जे कदाचित विकसित देश असलेल्या अमेरिकेत नाही. याच कारणामुळे या महिलेला सातव्या महिन्यात जन्मलेल्या आपल्या 12 दिवसांच्या बाळाला सोडून नोकरीवर पुन्हा जाण्याची वेळ आली. हे वाचा - हृदयद्रावक! 7 दिवसांची चिमुकली बर्फ बनली; बापाच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू अमेरिकेत मॅटर्निटी लिव्हचा कायदा इतर विकसित देशांच्या तुलनेत फार चांगला नाही. इथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये नवमातांसाठी काही सुरक्षित नियम किंवा कायदे नाहीत. प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आणि अटी आहेत. मॅटर्निटी लिव्हवर गेल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल, पगार मिळणार की नाही, नोकरी राहणार की नाही याबाबत कठोर कायदा नाही किंवा याची काही गॅरंटीही देता येत नाही. महिलेने सांगितलं, प्रिमॅच्युअर बाळ असल्याने तिला NICU मध्ये ठेवावं लागलं. जिथं एका एका दिवसाचा खर्च इतका असतो की सुट्टी घेऊन इतकं बिल भरणं तिच्यासाठी अशक्य होतं. सुट्टीवर गेल्यावर पगार मिळणार नाही याचीही भीती आहे. त्यामुळे आपल्या लेकीला रुग्णालयात सोडलं आणि नोकरीवर आली. जेणेकरून जेव्हा बाळाला ती घरी आणेल तेव्हा ती मॅटर्निटी लिव्ह घेऊन त्याच्यासोबत आपला वेळ घालवेल. पण यामुळे तिला खूप दुःख होत होतं. व्हिडीओत तिने शेवटी, दिस इझ अमेरिका असंही लिहिलं आहे. हे वाचा - जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लेक करते काम; 14-14 तास ट्रेनिंग देते आई हा व्हिडीओ पाहून लोक भावुक झाले आहेत. त्यांनी तिला आर्थिक मदतही दिली. त्यानंतर तिने सोशल मीडिया युझर्सचे आभार मानले आहे. आता तिला रुग्णालयाच्या बिलाची चिंता नाही ती आता आपल्या बाळासोबत वेळ घालवू शकते, याचा आनंद तिला होतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.