नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : आपलं आयुष्य आपण घडवण्याची इच्छा मनात जरी ठेवलेली असले तरी, नशिबात काही तरी वेगळंच लिहिलेलं असतं. काही व्यक्तींना नशिबाने लिहिलेली वाट यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते. तर, काही व्यक्तींना प्रयत्न करूनही अपयशच पदरी पडतं. दिल्लीमध्ये राहणाऱ्या IAS ऋषिता गुप्ता (IAS Officer Rishita Gupta) यांचं आयुष्य देखील नशिबानेच बदललं असं म्हणावं लागेल. लहानपणापासूनच ऋषिता गुप्ता यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
मात्र, परिस्थिती बदलली आणि त्या आयएएस ऑफिसर (IAS Officer) झाल्या. ऋषिता गुप्ता यांच्या घरी अभ्यासाला महत्त्व असल्यामुळे लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर एमबीबीएस (MBBS) करण्याचं ठरवंल होतं. पण बारावी मध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यामुळेच त्यांच्या मनावर याचा परिणाम झाला आणि मेडिकल ॲडमिशनसाठी आवश्यक असणारे मार्क त्या मिळवू शकल्या नाहीत.
(हे पदार्थ वाढवतील कोरोनाचा धोका; बचावासाठी बदला खाण्या-पिण्याच्या सवयी)
त्यामुळे डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे बारावीनंतर त्यांनी इंग्लिश लिट्रेचरमध्ये आपलं ग्रॅज्युएशन (Graduation In English Literature) पूर्ण केलं. ग्रॅज्युएशननंतर 2015 मध्ये त्याने यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्या यशस्वी झाल्या. 2018साली त्यांना 18वा रँक मिळाला.
(कधी वापरून पाहिलीये चेहऱ्यासाठी मुगाची डाळ? पिंपल्स, सुरकुत्या,टॅनिंगही होतं कमी)
UPSC परीक्षा पास होण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.
यासाठी त्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास केला. याशिवाय क्लासेस आणि ऑनलाईन रिसर्च देखील केलं. ऋषिता यांनी नोट्स तयार करणं आणि मोट टेस्ट यांना महत्त्व दिलं. शिवाय नोट्समुळे त्यांना रिविजन करण्यात देखील फायदा मिळाला. मन्स परीक्षेसाठी ऋषिता यांनी भरपूर प्रॅक्टिस केली.
त्यामुळेच त्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळालं.
(हरहुन्नरी IAS ऑफिसर प्रियांका शुक्ला; झोपडपट्टीतल्या महिलेमुळे बदललं आयुष्य)
ऋषिता सांगतात "UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिझल्टपेक्षा अभ्यासाला महत्त्व द्यावं. करंट अफेयर्सचा दररोज अभ्यास करावा. त्यासाठी पेपर आणि मॅक्झिन चाळावेत". ऋषिता यांनी UPSC परीक्षेमध्ये 879 मार्क्स आणि इंटरव्यूमध्ये 180 मार्क मिळवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Inspiration, Success stories, Upsc exam