मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हे पदार्थ वाढवतील कोरोनाचा धोका; बचावासाठी बदला खाण्या-पिण्याच्या सवयी

हे पदार्थ वाढवतील कोरोनाचा धोका; बचावासाठी बदला खाण्या-पिण्याच्या सवयी

वाढलेलं वजन फर्टिलिटीवर परिणाम करतं. ओवूलेशन सायकल वरती वाढलेल्या वजनाचा 5 टक्‍क्‍यांनी परिणाम होऊन ओवूलेशन कमी होतं. त्यामुळे डॉक्टरांच्यामते फर्टिलिटी वाढवण्यासाठी दिवसातून 3 वेळा जास्त जेवण्यापेक्षा 5 ते 6 वेळा प्रमाणात आहार घ्यावा.

वाढलेलं वजन फर्टिलिटीवर परिणाम करतं. ओवूलेशन सायकल वरती वाढलेल्या वजनाचा 5 टक्‍क्‍यांनी परिणाम होऊन ओवूलेशन कमी होतं. त्यामुळे डॉक्टरांच्यामते फर्टिलिटी वाढवण्यासाठी दिवसातून 3 वेळा जास्त जेवण्यापेक्षा 5 ते 6 वेळा प्रमाणात आहार घ्यावा.

खाण्यापिण्याच्या काही सवयी बदलल्यास कोरोनापासून बचाव (Foods that help avoid corona) होऊ शकतो, असं या संशोधनात समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : कोरोना रुग्णांची संख्या घटत असली, तरी कोरोना विषाणूचा नवा डेल्टा वेरिएंटही (Corona Delta Variant) समोर आला आहे. त्यामुळे कोरोनापासून कसा बचाव करता येईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी विविध देशांमध्ये संशोधनही सुरू आहे. शिकागोमधल्या नॉर्थ-वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधल्या संशोधकांनी कोरोना संक्रमण आणि आहार (Corona infection and diet) यातल्या संबंधांवर संशोधन केलं. खाण्यापिण्याच्या काही सवयी बदलल्यास कोरोनापासून बचाव (Foods that help avoid corona) होऊ शकतो, असं या संशोधनात समोर आलं आहे.

    कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं या गोष्टी तर अनिवार्य आहेतच. यासोबतच आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडेही (Diet to avoid corona) लक्ष द्यावं लागणार आहे. तुमचा आहार चांगला असेल, तरच तुमची रोगप्रतिकारशक्ती (Immune system) वाढणार आहे. शिकागोमधल्या संशोधकांनी आपल्या संशोधनात 38 हजार व्हॉलंटियर्सचा अभ्यास केला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. एकूण व्हॉलंटियर्सपैकी 17 टक्के जण कोरोना पॉझिटिव्ह होते. यात असं दिसून आलं, की कॉफी, फळं आणि ताज्या भाज्या आहारात असल्या, तर कोरोनाचा धोका 10 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. लहान बाळांमध्ये आईचं दूध प्यायल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो.

    कॉफीमध्ये बऱ्याच प्रमाणात पॉलीफेनॉल्स असतात. त्यातलं क्लोरोजेनिक अॅसिड इम्युन सिस्टिमला मजबूत करतं, तसंच इन्फ्लेमेशन कमी करण्यासही मदत करतं. त्यामुळे दररोज एक किंवा जास्त कप कॉफी पिणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती (Coffee helps immune system) इतरांच्या तुलनेत अधिक असते. कॉफीसोबतच गाजर, केळी, काजू आणि पालकही शरीरातलं इन्फ्लेमेशन (Reduce inflammation) कमी करण्यास मदत करतात. यासोबतच, ताज्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असणारी मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सदेखील आपल्या इम्युन सिस्टमला मजबूत बनवतात.

    गर्भावस्थेत नको ब्युटीपार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरच्याघरीच घ्या त्वचेची काळजी

    आपल्या शरीराला मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स या दोन्हींची आवश्यकता असते. चिकन, लाल मांस, डाळी, बीन्स, वाटाणे, हिरव्या भाज्या, मश्रूम, शेंगदाणे, पनीर, ओट्स, ब्राउन राइस, दही, बदाम अशा गोष्टींचा आहारात समावेश केल्यास (Food that makes your immune system strong) आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक घटकांच्या बऱ्याच गरजा पूर्ण होतात. अर्थात, प्रक्रियायुक्त मांस खाताना काळजी बाळगणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा (Corona and Processed meat) धोका 10 टक्क्यांनी वाढू शकतो.

    कोविडच्या संसर्गापासून बचावासाठी शरीरामध्ये आणखी एक पोषक तत्त्व (Corona and Omega-3) असणं गरजेचं आहे, ते म्हणजे ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स. आपल्या शरीराला तीन प्रकारच्या ओमेगांची गरज असते. एएलए, डीएचए आणि ईपीए. ओमेगा एएलए हा प्रामुख्याने वनस्पतीच्या तेलामध्ये आणि बियांमध्ये आढळतो. शिया सीड्स आणि कॅनोला ऑइल ही याची मुख्य उदाहरणं. ओमेगा डीएचए आणि ईपीए हा केवळ मासे आणि शैवालात आढळून येतो. मासे शैवाल खात असल्यामुळे माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 आढळून येतं.

    ही वाईट सवय तुम्हालाही नाही ना ? चुकूनही पिऊ नका या वेळी चहा

    नवजात बाळांमध्ये ब्रेस्टफीडिंग (Breastfeeding and corona) हा कोणत्याही इन्फेक्शनपासून बचावाचा सर्वोत्तम पर्याय असतो. सर्दी-पडसं, आतड्यांचं आणि कानाचं इन्फेक्शन, तसंच श्वसनमार्गाचं इन्फेक्शन अशा आजारांपासून बचावासाठी बाळांना आईचं दूध देणं गरजेचं असतं. कोरोना हेही श्वसनमार्गाचं इन्फेक्शनच (respiratory tract infection) आहे.

    First published:

    Tags: Corona, Food