Home /News /lifestyle /

कधी वापरून पाहिलीये चेहऱ्यासाठी मुगाची डाळ? पिंपल्स, सुरकुत्या,टॅनिंगही होतं कमी

कधी वापरून पाहिलीये चेहऱ्यासाठी मुगाची डाळ? पिंपल्स, सुरकुत्या,टॅनिंगही होतं कमी

पार्लरची महागडी ट्रीटमेंट (Treatment) घेण्यापेक्षा घरगुती फेस पॅक (Face Pack) लावून चेहरा तजेलदार आणि सुंदर करू शकता यासाठी मूगडाळही वापरता येते.

    नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : मुली, महिला कुणालाही चेहरा सुंदर (Beautiful Face) दिसावा असं वाटतंच. त्यासाठी कितीतरी उपाय (Remedies) आपण करतो. ब्युटी ट्रिटमेन्ट (Beauty Treatment) घेतो. वेळेआधी चेहऱ्यावरच्या सुरकुत्या (Wrinkle) दिसायला लागल्या तर, जास्त टेन्शन (Tension) यायला लागतं. हल्ली बदललेली लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी, अपूरी झोप यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढायला लागंल आहे. याशिवाय प्रदूषण आणि स्ट्रेसमुळे देखील रिंकल्स वाढायला लागतात. सुरकुत्या येण्याचा त्रास असेल तर, त्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करता येतात. पार्लरची महागडी ट्रिटमेंट (Treatment) घेण्यापेक्षा घरगुती फेस पॅक (Face Pack) लावून चेहरा तजेलदार आणि सुंदर करू शकता यासाठी मूगडाळही वापरता येते. याआधी चेहऱ्यासाठी चण्याची डाळ, मसुर डाळीचा वापर केला असंल मात्र, मुगाच्या डाळीचा फेसपॅक (Mugdal Face pack) देखील चेहर्यासाठी उत्तम मानला जातो. यासाठी चांगल्या प्रतीची मूगडाळ वापरा. मुगडाळ पाण्यामध्ये भिजत घाला. भिजल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे फायबर्स निघून जातील. याशिवाय साल असलेल्या मुगाची डाळही वापरता येते. फेस पॅक करण्यासाठी 2 चमचे मुगाची डाळ,1 चमचा चंदन पावडर, 4 बदाम, 10 ते 15 कडी पत्त्याची पानं., अर्धा चमचा मध आणि गुलाबपाणी याची आवश्यकता आहे. (हरहुन्नरी IAS ऑफिसर प्रियांका शुक्ला; झोपडपट्टीतल्या महिलेमुळे बदललं आयुष्य) स्किन टायटनिंग मूग डाळ भिजवून स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर मूगडाळीत, कडीपत्त्याची पानं, भिजलेले बदाम यांची पेस्ट करा. पेस्ट करताना त्यात कमीतकमी पाणी वापरा. त्यामध्ये गुलाब पाणी, चंदन पावडर मध एकत्र करा. या फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावावा. 15 ते 20 मिनिटांनंतर धुवून टाका. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात, स्किन टाइट होऊन, चेहरा उजळेल, पिंपल्स कमी होऊन चेहऱ्यावरचे डागही कमी होतील. हा फेसपॅक आठवड्यातून तीन वेळा लावा चांगला परिणाम मिळेल. (टक्कल पडायला लागलं? या उपायांनी केस गळणं थांबेल; येतील नवीन केस) पिंपल्स कमी मूग डाळीमुळे चेगऱ्यावरची डेड स्किन नाहीशी होऊन त्वचा आतून आणि बाहेरूनही मॉश्चराईज होते. मूग डाळीचा फेसपॅक ड्राय त्वचेसाठी फायदेशीर आहे. मुग डाळीच्या पेस्टमध्ये चमचाभर तूप टाकून चांगलं मिश्रण तयार करा. त्यानंतर ही पेस्ट १० ते १५ मिनिट चेहऱ्यावर लावा. पेस्ट वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. पिंपल्स कमी होतील. (डावखुऱ्या व्यक्तींचा मेंदू असतो आपल्यापेक्षा तल्लख? वाचा तज्ज्ञ काय सांगतात) टॅनिंग कमी उन्हामुळे त्वचेवर झालेल टॅनिंग कमी करता येतं. मुगडाळीची पेस्ट करून त्यामध्ये थोडं दही आणि कोरफड घालून ही पेस्ट चेहरा किंवा टॅन झालेल्या भागेवार 5 ते 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने त्वचा धूवून घ्या. मूग डाळीमुळे त्वचा मॉश्चराईज होऊन मुलायम आणि सॉफ्ट होते. एक छोटा चमचा मूग डाळ पावडर लोशनमध्ये घालून लावा. आठवड्यातून 3 हा प्रयोग करावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Face Mask, Lifestyle, Skin care

    पुढील बातम्या