Home /News /lifestyle /

IAS अधिकारी नम्रता जैन त्यांच्या जिद्दीला सलाम! IPS होऊनही दिली UPSCची परीक्षा

IAS अधिकारी नम्रता जैन त्यांच्या जिद्दीला सलाम! IPS होऊनही दिली UPSCची परीक्षा

नम्रता विद्यार्थ्यांना जिद्दीने अभ्यास करण्याचा सल्ला देतात.

नम्रता विद्यार्थ्यांना जिद्दीने अभ्यास करण्याचा सल्ला देतात.

गोळीबाराच्या आवाजातही आयएएस अधिकारी नम्रता जैन (IAS Namrata Jain) यांनी अभ्यास केला आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं.

    दिल्ली,05 ऑगस्ट : ज्या भागात सतत गोळ्यांचे आवाज येतात अशा भागामध्ये राहून शिक्षणाची आस न सोडणाऱ्या नम्रता जैन या आज आपल्या देशात आयएएस अधिकारी (IAS Namrata Jain)  म्हणून काम करत आहेत. नम्रता जैन यांचं बालपण दंतेवाडाच्या बस्तरमध्ये (Bastar,Dantewada) गेलं. तिथेच दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या भिलाईमध्ये (Bhilai)आल्या. त्यांचे वडील बिझनेसमन आहेत. अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) पास करून IAS होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. (बिहारची ‘सुपर कॉप’ नवज्योत सिंग IPS होण्यासाठी सोडली डॉक्टरी) नम्रता जैन यांनी 2015 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं. मात्र, हार न मानता त्यांनी पुन्हा एकदा 2016 मध्ये UPSCची परीक्षा दिली. (IRCTC ची जबरदस्त ऑफर! लेह लडाखसह या 7 सुंदर ठिकाणी द्या भेट, वाचा काय आहे पॅकेज?) या 1 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी आपल्या झालेला चुका दुरुस्त केल्या आणि अभ्यासाची पद्धती बदलली. 2016 मध्ये त्यांना यश मिळालं 99वा रँक मिळवत त्या IPS साठी सिलेक्ट झालेल्या. पण, त्यांचं स्वप्न आयएएस अधिकारी (IAS Officer) होण्याचं होतं. (कधी प्यायला आहे तमालपत्राचा काढा? कोणत्याही वेदनेत त्वरित मिळतो आराम) म्हणून त्यांनी आयपीएस अधिकारी (IPS Officer) पदी रुजू झाल्यानंतर देखील UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. 2018 मध्ये पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि देशात 12वा रँक मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. (Work from Home ला कंटाळलेल्यांसाठी या शहरात उभे राहिले Work pods! काय आहे नेमकं?) नम्रता विद्यार्थ्यांना जिद्दीने अभ्यास करण्याचा सल्ला देतात. त्या सांगतात प्रिलियम्स,मेन्स आणि इंटरव्यू या तीनही टप्प्यांचा अभ्यास एकत्र करायला हवा. याशिवाय पाठांतर आणि प्रॅक्टिसला देखील महत्त्व द्यायला हवं. परीक्षेच्या आधी रिविजन पूर्ण करायला हवी असंही त्या सांगतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ias officer, Inspiring story, Success stories, Upsc exam

    पुढील बातम्या