मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Work from Home ला कंटाळलेल्यांसाठी पर्याय; या शहरात उभे राहिलेत Work pods! काय आहे नेमकं हे?

Work from Home ला कंटाळलेल्यांसाठी पर्याय; या शहरात उभे राहिलेत Work pods! काय आहे नेमकं हे?

घरी पुरेसा जागा उपलब्ध नसणाऱ्यांसाठी रहीवासी भागात वर्क पॉड्स डिझाइन केलेले गेले आहेत.

घरी पुरेसा जागा उपलब्ध नसणाऱ्यांसाठी रहीवासी भागात वर्क पॉड्स डिझाइन केलेले गेले आहेत.

हे वर्क पॉड सध्या कोलकाताच्या न्यू टाऊन (Kolkata New Town) भागात चर्चेचा विषय आहेत. ज्या भागात आधीपासून ऑफिसेस आहेत त्याच भागात आता वर्क पॉड जागा घेत आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : कोरोनामुळे (Corona)आपली काम करण्याची पद्धत बदलेली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे (Work From Home) घरी राहुनच ऑफिसचं (Office Work) काम केलं जातं आहं. लॉगडाऊन शिथील होत असला तरी, बऱ्याचं ऑफिसने कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवासाचा (Traveling) त्रास वाचतोय आणि कोरोनाची भीती कमी होतीय. मात्र ज्यांच्या घरी काम करण्यासाठी भरपूर जागा (Work space) आहे त्यांना या पद्धतीने फायदा झाला असला तरी, ज्याचं घर छोटं आहे, घरात मुलं किंवा माणस जास्त राहतात अशांना वर्क फ्रॉम होम करताना कामाकडे लक्ष देणं कठीण होतं. कामाचा ताण आणि घरातलं वातावरण (Work stress and home environment) यांची सांगड घालण कठीण जातं.

त्यामळे या अडचणीवर मात करण्यासाठी आता कोलकातामध्ये (Kolkata) नवी शक्कल लढवली आहे. घरून काम करणाऱ्यांसाठी पण, घरी पुरेसा जागा उपलब्ध नसणाऱ्यांसाठी रहीवासी भागात वर्क पॉड्स (Work pods) डिझाइन केलेले गेले आहेत. हे वर्कस्पेस (Work Space) सहजपणे कामावर लक्षकेंद्रीत (Concentration on Work) करता येतील असे असून दिवसाच्या किंवा तासाच्या हिशेबाने भाड्याने घेता येतात.

(दुधाला ‘हा’ पर्यायही आहे उत्तम; रोज घेतल्यास वजन होईल कमी, डायबेटीज राहील दूर)

हे वर्क पॉड सध्या कोलकाताच्या न्यू टाऊन (Kolkata New Town) भागात चर्चेचा विषय आहेत. ज्या भागात आधीपासून ऑफिसेस आहेत त्याच  भागात आता वर्क पॉड जागा घेत आहेत. तिथे कामासाठी सुविधा असणारी जागा स्टोरेज सिस्टीमसह मिळते ती देखील अगदी परवडणाऱ्या भाड्यामध्ये. दिड तासासाठी केवळ 30 रुपये भाडं (Rent) आकारलं जातं.

('बेटा बेटा ना कर, अब तेरा...', गोड गोड गात सुनेने सासूलाच दिली धमकी; पाहा VIDEO)

शिवाय हवं असल्यास कॉफी आणि स्नॅक्सही मिळतं.न्यूज 18 डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत, पश्चिम बंगाल हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (WBHIDCO) व्यवस्थापकीय संचालक देबासिस सेन सांगतात, “वर्क फ्रॉम होम आता सर्वसामान्य गोष्ट होत चालली आहे. पण, त्यासाठी भारतीय घरांची रचना फारशी पुरक नाही. वर्क पॉड निवासी भागात बिनधास्त काम करण्याची संधी देतात”. यामुळे बर्‍याच लोकांना मदत होईल अशी त्यांना आशा वाटते.न्यु टाऊनमध्ये सध्या याची उभारणी सुरू आहे. याच महिन्यात 13 ऑगस्टला वर्क पॉड उपलब्ध होतील. यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे पण, फर्स्ट कम फर्स्ट या तत्वाने वर्क पॉड दिले जातील.

(दातांकडे करू नका दुर्लक्ष; ही लक्षणं दिसली तर गंभीर आजाराचे संकेत समजा)

स्वयंसेवी संस्थेसाठी काम रणाऱ्या सोहिनी राउथ यांनी या नवीन सकल्पनेचं स्वागत केलंय. त्या म्हणतात "या प्रकारचे पॉड्स कामासाठी उपयोगी ठरतील. इथे काम करणं सोपं जाईल कारण वर्क फ्रॉम होममध्ये घरी कामासाठी शांतता मिळवणं कठीण जातं.” वर्क पॉड वरून काम करतांना तुमच्या कामात जास्त व्यत्यत येत नाही.

(20 आवाज काढत चालली झुकझुक आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO)

आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करता येतं. शिवाय ऑनलाईन मीटिंगसाठीही फायदेशीर आहे. तर, प्रवासाची दगदग आणि खर्चही वाचतो. शिवाय ऑफिसचा फिल येतो. कारण,दररोज कामावर जाण्याच्या पद्धतीने तयार होऊन आपण घराबाहेर पडतो.

First published:

Tags: Kolkata, Lifestyle, West bangal, Work from home