मराठी बातम्या /बातम्या /मनी /IRCTC ची जबरदस्त ऑफर! लेह लडाखसह या 7 सुंदर ठिकाणी द्या भेट, वाचा काय आहे पॅकेज?

IRCTC ची जबरदस्त ऑफर! लेह लडाखसह या 7 सुंदर ठिकाणी द्या भेट, वाचा काय आहे पॅकेज?

तुम्ही घरी राहून कंटाळलेले आहात आणि छानशी ट्रीप करावी असं तुमच्या मनात आलं असेल तर भारतीय रेल्वे (Indian Railways) लेह-लडाखसह (Leh-Ladakh) 6 ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

तुम्ही घरी राहून कंटाळलेले आहात आणि छानशी ट्रीप करावी असं तुमच्या मनात आलं असेल तर भारतीय रेल्वे (Indian Railways) लेह-लडाखसह (Leh-Ladakh) 6 ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

तुम्ही घरी राहून कंटाळलेले आहात आणि छानशी ट्रीप करावी असं तुमच्या मनात आलं असेल तर भारतीय रेल्वे (Indian Railways) लेह-लडाखसह (Leh-Ladakh) 6 ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

  नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: तुम्ही घरी राहून कंटाळलेले आहात आणि छानशी ट्रीप करावी असं तुमच्या मनात आलं असेल तर भारतीय रेल्वे (Indian Railways) लेह-लडाखसह (Leh-Ladakh) 6 ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या सात दिवसांच्या ट्रिपसाठी तुम्हाला फक्त 32 हजार रुपये खर्च करावे लागतील. irctctourism.com ने दिलेल्या माहितीनुसार ही सहल अहमदाबादमधून (Ahmadabad) सुरू होणार असून अहमदाबाद ते लेह हा प्रवास इंडिगो विमानाने (Indigo Airlines) केला जाईल. या सहलीत अहमदाबाद-लेह-नुब्रा-तुरतुक-पँगाँग-लेह- अहमदाबाद या ठिकाणांचा समावेश असेल.

  आयआरसीटीसीने (IRCTC) सांगितलंय की अहमदाबाद विमानतळावरून तुमचा प्रवास सुरू होईल. लेहमध्ये पोहोचल्यावर हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर तुमच्या सहलीला सुरुवात होईल.

  IRCTC ने ट्वीट करून दिली माहिती

  आयआरसीटीसीने ट्वीट (IRCTC Tweet) करून याबद्दलची माहिती दिली आहे. या सहलीला 27 ऑगस्ट 2021 पासून अहमदाबादेतून सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही irctctourism.com या वेबसाइटवर जाऊ शकता.

  पहिला दिवस

  आयआरसीटीसीच्या या सहलीला अहमदाबाद विमानतळावरून सुरुवात होईल इथून तुम्ही थेट लेहला पोहोचाल आणि तिथल्या हॉटेलमध्ये चेक इन कराल.

  हे वाचा-करदात्यांना दिलासा! CBDT ने वाढवली ITR इलेक्ट्रॉनिक फायलिंगची डेडलाइन

  दुसरा दिवस

  दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर प्रवासाला सुरुवात होईल. त्यानंतर तुम्ही लेह-श्रीनगर हायवेवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत-देत पुढे जाल. इथे तुम्हाला हॉल ऑफ फेम (Hall of Fame), काली मंदिर आणि गुरुद्वारा पत्थर साहिब पहायची संधी मिळेल. त्यानंतर शांती स्तुप आणि लेह पॅलेस तुम्ही पाहणार आहात.

  तिसरा दिवस

  तिसऱ्या दिवशी नाश्ता केल्यानंतर तुम्ही खारदुंग लातून नुब्रा घाटीच्या (Nubra Vally) दिशेने निघाल. या रस्त्याला सर्वोत्तम रस्ता म्हणून नावाजलं जातं. वाटेत खार दुंग लाजवळ विशाल पर्वतरांगांचं दर्शन घडेल आणि तुम्ही त्यात मनाने गुंतून जाल. इथं तुम्ही शिबिरात चेक इन कराल. दुपारच्या जेवणानंतर तुम्ही पुढे जाल.

  चौथा दिवस

  चौथ्या दिवशी सकाळचा नाश्ता केल्यानंतर तुम्ही तुरतुकला जाल. इथं तुम्हाला टरटुक घाटी पहायला मिळेल. रात्रीची विश्रांती तुम्ही नुब्रा व्हॅलीत घ्याल.

  हे वाचा-Post Office: या योजनेतून मिळवा दुप्पट पैसे,5 लाखांची गुंतवणूक मिळवून देईल 10 लाख

  पाचवा दिवस

  पाचव्या दिवशी नाश्त्यानंतर तुम्ही पँगाँग तलावाकडे जाल. पँगाँग तलाव (Pangong Lake) हा 120 किलोमीटर लांब आणि 6 ते 7 किलोमीटर रुंद विस्तारलेला असून हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. इथलं निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. इथं थांबून निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

  सहावा दिवस

  सकाळी उठल्याउठल्या तुम्हाला तलावावरून सूर्योदय (Sunrise) पहायला मिळेल. नाश्ता केल्यानंतर तुम्ही पुन्हा लेहच्या दिशेने प्रवास सुरू कराल. रस्त्यात थिकसे मठ आणि शे पॅलेस तुम्ही पाहणार आहात. हॉटेलवर पोचल्यावर संध्याकाळी मोकळ्या वेळेत तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करू शकता.

  सातवा दिवस

  सकाळी नाश्ता केल्यानंतर हॉटेलमधून चेकआउट करून अहमदाबादसाठीच्या विमानात बसण्यासाठी तुही लेहच्या विमानतळावर पोहोचाल.

  या सुविधा मिळणार नाहीत

  अहमदाबादमधील विमानतळावर यात्रेकरूंना स्वत: ला पोहोचावं लागेल तिथं पोहोचवण्याची सेवा मिळणार नाही. त्याशिवाय नुब्रा व्हॅलीत उंटावर बसायचं असेल तर त्याचे तुम्हाला स्वतंत्र पैसे (Extra Charge) द्यावे लागतील. ते पैसे या पॅकेजमध्ये नाहीत. हॉटेल भाडं, टिप्स, फोनचं भाडं, कपडे धुण्याचे पैसे आणि वैयक्तिक वापरासंबंधीच्या कुठल्याही सुविधांचा या पॅकेजमध्ये समावेश नाही. तो खर्च तुम्हाला करावा लागेल. कुठल्याही स्मारकात जाण्याची प्रवेश फी आणि तिथं शूटिंग किंवा फोटोग्राफी करण्याची फी तुम्हाला भरावी लागेल तसंच जर तुम्हाला पॅकेजमध्ये दिलेल्या जेवणाव्यतिरिक्त काही पदार्थ घ्यायचे असतील तर त्याचे जास्त पैसे तुम्हालाच भरावे लागतील असं आयआरसीटीसीने स्पष्ट केलं आहे.

  First published:

  Tags: IRCTC