लंडन, 28 सप्टेंबर : कोरोनाचा (Coronavirus) परिणाम फक्त कोरोना (Covid 19) झालेल्यांवरच नाही तर कोरोना (Corona) न झालेल्यांवरही होतो आहे आणि त्याचं कारण म्हणजे कोरोना लॉकडाऊन (Corona lockodown). व्हायरसमुळे आजारी पडले नाहीत तरी काही लोकांना शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागतो आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे बळावलेल्या अशाच एका आजारामुळे एका चिमुकलीची अवस्था भयंकर झाली आहे. या चिमुकल्याच्या डोक्यावरील आणि डोळ्यांच्या पापण्यांवरील केस गायब झाले आहेत (Girl bald in corona lockdown).
ब्रिस्टोलमध्ये राहणारी (Bristol) 8 वर्षांची एमेलिया (Amelia). या बातमीचा फोटो तुम्ही पाहिला तर पहिल्या फोटोत तिच्या डोक्यावर सुंदर केस दिसत आहेत. पण दुसऱ्या फोटोत मात्र तिच्या डोक्यावर एकही असा लांब केस शिल्लक राहिला नाही. तिला टक्कल पडलं आहे. एमेलियाला टक्कल पडण्याचं कारणही तितकंच धक्कादायक आहे. एमेलियाचे स्वतःचेच केस स्वतः खेचून काढले आहेत (Girl Rip out her hair in corona lockdown).
एमेलियाची आई जेमा मँसीने (Jemma Mansie) मिरर वेबसाईटशी बोलताना सांगितलं, पहिल्या लॉकडाऊनमध्ये एमेलिया आपल्या डोळ्यांच्या पापण्या खेचायची. हळूहळू करून तिने पापण्यांवरील सर्व केस काढून टाकले. त्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिने आपल्या डोक्यावरील केस खेचून काढायला सुरुवात केली.
हे वाचा - या ड्रिंक्समुळे पॉझिटिव्ह येऊ शकतो कोरोना रिपोर्ट; समोर आली धक्कादायक बाब
जेमा मँसी म्हणाली, तिने पहिल्यांदा आपल्या मुलीला डोळ्यांच्या पापण्यांचे केस खेचताना पाहिलं आणि तिला धक्काच बसला. त्यावेळी तिनं थोडं दुर्लक्ष केलं पण यामुळे आता तिच्या पापणीवर एकही केस नाही. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये तिने आपल्या डोक्यावरील केस काढायला सुरुवात केली. मुलीला असं करताना पाहून ती तिला समजावयीच. असं करू नको म्हणून बजावायची. पण स्ट्रेसमुळे ती असं करत असेल असं समजून तिने तिला जास्त त्रास होऊ नये म्हणून फार दबाव टाकला नाही..
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, मित्रमैत्रिणींना भेटणं नाही त्यामुळे तिला खूप तणाव (Lockdown Stress) आला. यामुळे तिला trichotillomania ही विचित्र समस्या झाली. ज्यामुळे ती स्वतःचे केस खेचून काढून लागली (Girl rip out own hair), असं जेमाने सांगितलं.
हे वाचा - चिंताजनक..! कोरोनामुळं वजन कमी होणं आणि कुपोषणाचा धोका वाढलाय; डॉक्टरांचा इशारा
लॉकडाऊनमध्ये एमेलियाला इतका स्ट्रेस आला की तिने आपले केस ओरबडून काढायला सुरुवात केली. आपले केस हळूहळू तोडत गेली आणि आता तिला पूर्ण टक्कल पडलं आहे. तिच्या डोक्यावर मोजकेच केस उरले आहेत. ती काय करत होती हे तिलाही समजत नव्हतं. पण आता तिला अशा अवस्थेत घराबाहेर जायलाही लाज वाटते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना ती डोक्यावर कापड गुंडाळते, असं तिच्या आईने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Mental health