मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /चिंताजनक..! कोरोनामुळं वजन कमी होणं आणि कुपोषणाचा धोका वाढलाय; डॉक्टरांचा इशारा

चिंताजनक..! कोरोनामुळं वजन कमी होणं आणि कुपोषणाचा धोका वाढलाय; डॉक्टरांचा इशारा

कोरोनामुळे (Corona) शरीराचे अनेक भाग आणि त्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आता वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांचे वजन कमी होऊ लागले आहे.

कोरोनामुळे (Corona) शरीराचे अनेक भाग आणि त्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आता वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांचे वजन कमी होऊ लागले आहे.

कोरोनामुळे (Corona) शरीराचे अनेक भाग आणि त्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आता वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांचे वजन कमी होऊ लागले आहे.

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : आता जवळपास प्रत्येकाला माहीत आहे की, कोरोना संसर्गानंतर (Corona Infection) त्याची काही लक्षणे रुग्णांमध्ये बराच काळ टिकून राहतात. कोरोनाची लक्षणे काही रुग्णांमध्ये वर्षभरानंतरही दिसतात. कोरोनामुळे (Corona) शरीराचे अनेक भाग आणि त्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आता वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांचे वजन कमी होऊ लागले आहे. कोरोनामुळे ज्यांची स्थिती फार क्रिटिकल झाली होती अशा लोकांना ही समस्या अधिक येत आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, अशा केसेसबाबतची अद्याप कोणतीही स्पष्ट आकडेवारी समोर आली नसली तरी, काही अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, ज्या कोरोना रुग्णांना गंभीर स्थितीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले किंवा ज्यांनी कोरोना झाल्यावर तोंडाची चव गमावली होती, त्यांचे वजन कमी होत आहे. तसेच ज्या रुग्णांना श्वसनाच्या गंभीर समस्या होत्या, अशा रुग्णांमध्ये कुपोषणाचीही समस्या दिसून आली आहे.

काळ्या बुरशी (Black Fungus) ला बळी पडलेल्यांना जास्त धोका

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (National Center for Biotechnology Information -NCBI)च्या अभ्यासानुसार, जे लोक कोरोनामध्ये गंभीर आजारी होते त्यांना कमी वजनाचा आणि कुपोषणाचा जास्त धोका असतो. सुमारे 30 टक्के रुग्णांमध्ये शरीराचे वजन 5 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. कोरोनामुळे गंभीरपणे आजारी पडलेल्या सुमारे अर्ध्या रुग्णांना कुपोषणाचा धोका आहे.

हे वाचा - KBC 13: महिलेने बिग बीना सांगितली घरची व्यथा; पतीने पाठवली कायदेशीर नोटीस; जाणून घ्या नेमकं प्रकरण

भाटिया हॉस्पिटलमधील डॉ.अभिषेक सुभाष म्हणाले की, चव आणि वास कमी झाल्यामुळे बहुतेक कोविड रुग्णांचे वजन कमी होत आहे. त्यांनी सांगितले की, ही समस्या त्या रुग्णांमध्ये अधिक गंभीर आहे, जे म्यूकोर्मायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराला बळी पडले होते. अशा रुग्णांना कोरोना संसर्गादरम्यान बुरशीजन्य विरोधी उच्च डोस औषध दिले गेले, ज्यामुळे रुग्णांमध्ये अस्वस्थता वाढली आणि भूक लागण्याची समस्या निर्माण झाली.

हे वाचा - अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; आरोपीने पोलीस ठाण्यातच संपवलं जीवन

चव आणि वास बदलल्यामुळे भूक न लागणे

अभ्यासामध्ये असे आढळून आले की, चव आणि वासामध्ये बदल झाल्यामुळे, रुग्ण खूप थकल्यासारखे होते आणि त्यांची भूक कमी होते. याशिवाय, घरी आल्यानंतर शारीरिक हालचालीही पूर्णपणे थांबल्या. यामुळे वजन कमी होणे स्वाभाविक आहे. यासह, शरीराच्या आत जळजळ होण्याची समस्या देखील कुपोषणाचा धोका वाढवते. अगदी कोरोना रूग्णांमध्ये ज्यांना रुग्णालयात जावे लागत नव्हते, अशा काही रुग्णांमध्येही कुपोषणासारख्या समस्या दिसून आल्या आहेत.

First published:

Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus