मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या ड्रिंक्समुळे पॉझिटिव्ह येऊ शकतो तुमचा कोरोना रिपोर्ट; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

या ड्रिंक्समुळे पॉझिटिव्ह येऊ शकतो तुमचा कोरोना रिपोर्ट; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

काही ड्रिंक्स किंवा पेयांचा या टेस्टिंगवर परिणाम होतो, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

काही ड्रिंक्स किंवा पेयांचा या टेस्टिंगवर परिणाम होतो, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

काही ड्रिंक्स किंवा पेयांचा या टेस्टिंगवर परिणाम होतो, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

    बर्लिन, 28 सप्टेंबर : देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळाला. सध्या दुसरी लाट बऱ्यापैकी आटोक्यात आली असताना तिसरी लाट (Corona Third wave) येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनाची लक्षणं (Coronavirus symptoms) दिसताच तातडीनं तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत. त्यातच संसर्गाची चाचणी (Corona test) घरबसल्या करण्याकरिता तपासणी किटचा (Corona Home Testing Kit) वापर वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणं दिसतात, म्हणून अनेक जण कोविड टेस्टिंग किटच्या मदतीने घरीच तपासणी करत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे अगदी सहजपणे जाणून घेणं शक्य होत आहे. तुम्ही कोविड टेस्टिंग किटचा (Covid -19 Testing Kit) वापर करत असाल अगर करण्याचा विचार करत असाल, तर वैज्ञानिकांनी केलेला हा खुलासा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही ड्रिंक्स किंवा पेयांचा या टेस्टिंगवर परिणाम होतो, असं संशोधनातून स्पष्ट झाल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.

    काही पेयं  (Drinks) कोविड-19 टेस्टवर परिणाम करू शकतात, असं संसर्गजन्य आजारांवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना दिसून आलं. जर्मनीतल्या टुंबिगेन युनिव्हर्सिटीत ट्रॉपिकल मेडिसीनचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या पथकानं नुकतंच याबाबतचं संशोधन इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शिअस डिसीजमध्ये प्रसिद्ध केलं.

    हे वाचा - शाळा सुरू करण्याला ग्रीन सिग्नल मिळताच धोक्याची घंटा; 32 विद्यार्थ्यांना कोरोना

    कोविड -19 लॅटरल फ्लो टेस्ट (Lateral Flow Test) कॅसेटवर कोणतंही पेय टाकलं तर त्याचा निष्कर्षावर निश्चित परिणाम होतो. सर्व सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल, कर्मिशिअली बॉटल्ड मिनरल वॉटर आणि कार्बोनेटेड मिनरल वॉटरचे काही थेंब टेस्ट किटवर (Test Kit) टाकल्यास रेड टेस्ट लाइन (Red Test Line) दिसू शकते. किटवरची ही रेड टेस्ट लाइन पॉझिटिव्ह इन्फेक्शन दर्शवते, असं वैज्ञानिकांनी सांगितलं.

    यामुळे चुकीचा अहवाल म्हणजेच फॉल्स पॉझिटिव्ह (False Positive) रिपोर्ट येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही किट्स भरवशाची आहेत. परंतु निगेटिव्ह असतानाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दर्शवण्यासाठी या किटचा गैरवापर होऊ शकतो. कोविड-19 लॅटरल फ्लो टेस्टचा वापर करून स्वतः पॉझिटिव्ह असल्याचं दर्शवू शकतो. यासाठी दैनंदिन वापरातल्या ड्रिंक्सचा वापर केला जाऊ शकतो, असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं.त्यामुळे या किटचा योग्य वापर होणं आवश्यक आहे.

    हे वाचा - कोरोनाच्या नवनवीन स्ट्रेनपुढे लशीचा प्रभावही होतोय कमी; तिसरा डोस फायद्याचा?

    दैनंदिन वापरातील कोणत्याही ड्रिंक्सच्या सोल्युशन्समध्ये पीएच (PH) बदललेले असतात. त्यामुळं टेस्ट लाइनमधल्या कोटेड अॅंटिबॉडीजचं कार्य सुधारतं. मात्र घरगुती वापराच्या कोविड-19 टेस्ट किटचा नेमकेपणानं वापर केला गेला तर त्याचा निष्कर्ष बिनचूकच येतो, असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona, Coronavirus