मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Treadmill Or Cycling : ट्रेडमिल की सायकलिंग, वजन कमी करण्यासाठी कोणता आहे बेस्ट ऑप्शन?

Treadmill Or Cycling : ट्रेडमिल की सायकलिंग, वजन कमी करण्यासाठी कोणता आहे बेस्ट ऑप्शन?

सहसा जेव्हा आपण जिममध्ये जातो तेव्हा वजन कमी करण्यासाठी ट्रेडमिल्स आणि सायकल असे वेगवेगळे मशीन असतात. या दोन्ही मशीनपैकी जास्त फायदेशीर पर्याय कोणता? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

सहसा जेव्हा आपण जिममध्ये जातो तेव्हा वजन कमी करण्यासाठी ट्रेडमिल्स आणि सायकल असे वेगवेगळे मशीन असतात. या दोन्ही मशीनपैकी जास्त फायदेशीर पर्याय कोणता? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

सहसा जेव्हा आपण जिममध्ये जातो तेव्हा वजन कमी करण्यासाठी ट्रेडमिल्स आणि सायकल असे वेगवेगळे मशीन असतात. या दोन्ही मशीनपैकी जास्त फायदेशीर पर्याय कोणता? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 27 नोव्हेंबर : हल्ली लोक आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत. त्यातही एखाद्याचे वजन जास्त असेल तर तिव्यक्ती आपल्या आरोग्याबद्दल खूप सजग झालेली असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जसा वेळ मिळेल तसे लोक व्यायाम करतात. काही लोक घरीच व्यायाम करतात. तर काही लोक लवकर बारीक होण्यासाठी जिमला जाणे पसंत करतात.

सहसा जेव्हा आपण जिममध्ये जातो तेव्हा वजन कमी करण्यासाठी ट्रेडमिल्स आणि सायकल असे वेगवेगळे मशीन असतात. बहुतेक लोक जिममध्ये यांचा करतात. ही दोन्ही यंत्र चरबी वितळवण्यासाठी खूप मदत करते. त्यामुळे त्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. या दोन्ही मशीनपैकी जास्त फायदेशीर पर्याय कोणता? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

दोरी उड्या की धावणं? वजन कमी करण्यासाठी कशाचा होतो फायदा

ट्रेडमिलचे फायदे

- जेव्हा तुम्ही ट्रेडमिलवर वर्कआऊट करता तेव्हा प्रथम तुम्ही वॉर्म अप होण्यासाठी वेग खूपच कमी ठेवू शकता आणि नंतर हळूहळू तो वाढवू शकता. ट्रेडमिल तुम्हाला तुमच्या आराम आणि तग धरण्याच्या क्षमतेनुसार वेग समायोजित करण्याची संधी देतात.

- याशिवाय जर तुम्ही इनक्लाइन ट्रेडमिल करत असाल तर कमी वेळेत तुम्ही भरपूर कॅलरीज बर्न करू शकता. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.

ट्रेडमिलचे तोटे

- ट्रेडमिलवर धावताना योग्य पवित्रा आणि वेग राखला नाही, तर दुखापत होण्याचाही धोका असतो.

- याशिवाय अनेक वेळा एकाच ठिकाणी वर्कआउट करताना एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करू शकत नाही.

सायकलिंगचे फायदे

- सायकलिंग अशी कसरत आहे की कोणीही अगदी सहज करू शकतो. हे प्रामुख्याने तुमचे ग्लुट्स, वासरे आणि मांड्या यावर काम करते. हे स्नायूंना टोन करण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते.

- एखाद्याला सांधेदुखीचा त्रास असला तरी तो सायकलिंग करू शकतो. मात्र त्याने तज्ञांच्या देखरेखीखाली वर्कआउट केले पाहिजे.

सायकलिंगचे तोटे

सायकलिंगचा एक तोटा असा आहे की यामुळे तुमचे संपूर्ण शरीर कार्य करत नाही. तसेच, ट्रेडमिलद्वारे सायकल चालवताना तुम्ही शक्य तितक्या कॅलरीज बर्न करत नाही.

व्यायामासाठी जिममध्ये जावं कि पार्क ठरेल फायदेशीर? या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

कोणता पर्याय आहे उत्तम?

हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ट्रेडमिल आणि सायकलिंग दोन्ही वजन कमी करण्यासाठी चांगले पर्याय आहेत. हे दोन्हीही शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करतात. या दोन्हींमध्ये एक फरक आहे. तो म्हणजे, ट्रेडमिलवर धावल्यास तुमच्या 8.18 ते 10.78 कॅलरीज प्रत्येक मिनिटाला बर्न होतात जिममधील सायकल चालवल्याने 7.98 ते 10.48 कॅलरीज प्रत्येक मिनिटाला बर्न होतात. त्यामुळे जिममधील सायकल चालवण्यापेक्षा ट्रेडमिल काही प्रमाणात जास्त फायदेशीर पर्याय असू शकतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Types of exercise