मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

दोरी उड्या की धावणं? वजन कमी करण्यासाठी कशाचा होतो फायदा

दोरी उड्या की धावणं? वजन कमी करण्यासाठी कशाचा होतो फायदा

वेळेचा विचार करता दोरी उडी हा कमी वेळात जास्त कॅलरीडज बर्न करणारा पर्याय आहे.

वेळेचा विचार करता दोरी उडी हा कमी वेळात जास्त कॅलरीडज बर्न करणारा पर्याय आहे.

वर्कआउट करण्याचा सगळ्यात जास्त फायदा वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी होतो. मूड खराब असेल सुस्ती आल्यासारख वाटत असेल. तर, एक्ससाईज केल्याने उत्साही वाटायला लागतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : कितीतरी जणांना वाटतं की, आपण सडपातळ असावं. वजन कमी करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. डॉक्टरांची औषधं,सल्ले ऐकतात. खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. व्यायाम करातात, जॉगिंग करतात. पण, वजन आटोक्यात येत नाही. वजन वाढीला  आपल्या आयुष्यातल्या काही सवयीच  कारणीभूत असतात. मात्र वजन कमी करण्यासाठी नेमके काय करावं हे कळत नसतं.

वर्कआउट करण्याचा सगळ्यात जास्त फायदा वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी होतो. मूड खराब असेल सुस्ती आल्यासारख वाटत असेल. तर, एक्ससाईज केल्याने उत्साही वाटायला लागतं. धावणं आणि दोरी उड्या मारणे हे दोन्ही फायदेशीर व्यायाम  आहेत. यामुळे शरीरात वाढलेल्या कॅलरीज बर्न होतात.

एखादा व्यायाम केल्याने हार्ट बीट वाढतात. कार्डियो वर्कआउटमुळे तर हृदयाची गती दिडपटीने वाढते. साधारणपणे 1 मिनिटात 60-80 वेळा हृदय धडधडत असतं, पण, कार्डिओ वर्कआउट केल्यावर,1 मिनिटात 100-130 या वेगात हार्ट बीट होतात. कार्डिओ वर्कआउटमुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते, घाम फुटतो. धावणे आणि दोरीउड्या मारणे हे दोन्ही वर्कआउट लोकप्रिय आहेत. ज्यामुळे वजन कमी होतच शिवाय फिटनेसही वाढवतो. या दोन्हा वर्कआउटमध्ये समानताही आहे आणि वेगेपणाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नेमकं काय चांगलं ते जाणून घेऊयात.

मसल्स मजबूत करण्यासाठी

धावणं किंवा दोरीवरच्या उड्या मारण्याने शरीराच्या खालच्या भागात आणि सांध्यांवरही दबाव येतो. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. त्याशिवाय धावताना आपले खांदे,नितंब आणि पायांच्या हालचालीमुळे लवचिकता येते. दोरीवरच्या उड्या मारताना नितंबांच्या स्नायूंची हालचाल होते त्यामुळे गुप्तांगाच्या भागातले स्नायू बळकट होतात. मनट,हात,ट्रायसेप्स,बायसेप्स आणि मनगटांची पकड देखील चांगली होते.

कॅलरी बर्न

वजन कमी करण्यासाठी धावणं आणि दोरी उड्या दोन्ही व्यायाम चांगले आहेत. मात्र कितीवेळ व्यायाम केला जातोय यावर परिणाम अवलंबून असतो. दोघांमधील कॅलरी बर्न करण्याच्या क्षमतेची तुलना केल्यास, 68 किलो वजनाची व्यक्ती 10 मिनिटांच्या दोरी उड्यांनी 140 कॅलरी बर्न करू शकते. तर मध्यम तीव्रतेने धावणारी व्यक्ती 10 मिनिटांत 125 कॅलरी बर्न करते.

धावणे आणि दोरी उड्यांचे फायदे

हे दोन्ही एरोबिक व्यायाम हृदयांची गती आणि सहनशक्ती वाढवणारे आहेत. दोरी उडी मारणे आणि धावणं आपल्या शरीरातील चरबी बर्न करण्यास मदत करतं.हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी ताकद वाढवते आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारते.

फायदेशीर काय?

वेळेचा विचार करता दोरी उडी हा कमी वेळात जास्त कॅलरीडज बर्न करणारा पर्याय आहे. पण, दोरी उडी आणि धावणं यातून निवड करायची असेल तर, आधी आपल्या शरीराचा विचार करावा. दोन्हीमध्ये शरीराच्या खालच्या स्नायूंचा जास्त सहभाग असतो सांधेदुखी, घोट्याच्या समस्येमुळे त्रस्त लोकांना त्याचा फायदा होणार नाही. त्याऐवजी हळूहळू चालण्याचा किंवा धावण्याचा प्रयत्न करावा.

हे वाचा - हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Weight gain, Weight loss