• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • रक्षाबंधनला बहिणीला करा खूश! बघा भेट देण्यासाठी बरेच आहेत पर्याय

रक्षाबंधनला बहिणीला करा खूश! बघा भेट देण्यासाठी बरेच आहेत पर्याय

रक्षाबंधनाची भेट म्हणून हॅन्ड बॅग किंवा क्लच हा एक चांगला पर्याय असू शकतो.

रक्षाबंधनाची भेट म्हणून हॅन्ड बॅग किंवा क्लच हा एक चांगला पर्याय असू शकतो.

रक्षाबंधनच्या (Rakshabndhan) दिवशी बहिणीला कोणती भेट (Gift) द्यावी हा प्रश्न सगळ्या भावांना पडलेला असतो. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नक्की वाचा.

 • Share this:
  नवी दिल्ली,11 ऑगस्ट : रक्षाबंधनच्या (Rakshabndhan) दिवसाची प्रत्येक भाऊबहिण वाट बघत असतात. बहिण या दिवशी भावाच्या हातावर राखी (Rakhi) बांधून संरक्षण करण्याचं जणू वचनच घेते. तर, भाऊसुद्धा आपल्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर भेट (Gift) देतो. पण, दरवर्षी आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न प्रत्येक भावाला पडतो. यावर्षी 22 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. महत्वाचं म्हणजे रक्षाबंधन रविवारी (Rakshabandhan On sunday) असल्याने बऱ्याचं जणांना ऑफिसला जाण्याचं टेन्शन नसणारे. पण, सगळ्या भावांना सतावणारा प्रश्न अजुनही सुटलेला नसेल, तो म्हणजे गिफ्ट काय असावं? रक्षाबंधनाला बहिणीसाठी कोणती भेटवस्तू (Gift for Sister) खरेदी करण्यासाठी पर्याय जाणून घ्या. हॅन्ड बॅग किंवा क्लचर क्षाबंधनाची भेट म्हणून हॅन्ड बॅग किंवा क्लच हा एक चांगला पर्याय असू शकतो. महिला आणि मुंलींना हॅन्ड बॅग आणि क्लच आवडात. बाजारात वेगवेगळ्या किंमतीत आणि क्वॉलिटीत याचे पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या बजेटनुसार किंवा आवडीनुसार घेऊ शकता. ऑनलाईनही खरेदी करू शकता. आजकाल वॉलेटची फॅशनही खूप ट्रेंडमध्ये आहे. बहिणीसाठी एखादं वॉलेट देखील खरेदी करू शकता. (फक्त या 7 सवयी लावा; स्मरणशक्ती वाढेल, मेंदू होईल तल्लख) मनगटी घड्याळ सध्या मोठ्या डायलच्या घड्याळाची फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहे. रक्षाबंधनाला बहिणीला भेट देण्यासाठी घड्याळ घेऊ शकता. आजकाल,मोठ्या ब्रँडची घड्याळं सहजपणे ऑफलाईन आणि ऑनलाईन बजेटमध्ये मिळतात. बहिणीला घड्याळ घालायला आवडत नसेल आणि ती फिटनेस फ्रिक असेल तर, तिच्यासाठी फिटनेस वॉच खरेदी करू शकता. यावरून 'हार्ट-बीट','कॅलरीज','कार्डिओ स्टेप्स' अशी बरीच माहिती मिळते. (पोटदुखीपासून हृदयरोग, डायबेटिज, कॅन्सरवरही गुणकारी; घरात हवंच हे आयुर्वेदिक औषध) ज्युलरी ज्युलरी किंवा दागिने या पर्याय गिफ्टसाठी सर्वात उत्तम आहे. सोन्याचे असोत किंवा खोट्या दागिन्यांची फॅशन कधीही आउटडेटेड होत नाही. बहिणीसाठी तुमच्या आवडीचे दागिने निवडू शकता. बहीण लहान असेल तर, जास्त मोठे दागिने घालणार नाही अशा वेळा अंगठी, छोटे कानातले देऊ शकता. आजकाल ज्वेलरीसुद्धा ऑनलाइन खरेदी करता येते. आता कस्टमाईज ज्युलरी मिळते. त्यामुळे रक्षाबंधनसाठी भेट देताना बांगड्या,अंगठ्या आणि पेंडंटवर भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित संदेशही लिहून गिफ्ट देता येईल. (अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला मेण; तरुणाची झाली भयंकर अवस्था) कॉस्मेटिक्स मुली,महिला कोणत्याही वयोच्या असल्या तरी कधी ना कधी कॉस्मेटिकचा वापर करतातच. त्यामुळे बहिणासाठी तिच्या आवडीचे  कॉस्मेटिक खरेदी करा. बहिणीला हेवी मेकअप करायला आवडत नसेल तर, न्यूड कलरचं मेकअप किट खरेदी करू शकता. काजळ पेन्सिल,लिपस्टिक,फाउंडेशन,मस्कर,आयशॅडो,कन्सिलर,प्रायमर यासारखे कॉस्मेटिक पर्याय ठरू शकतात. (मुंबईसह 12 शहरांवर मोठं संकट; समोर आला धक्कादायक रिपोर्ट) ड्रेस किंवा साडी ड्रेस किंवा साडी हा सुद्धा गिफ्टसाठी चांगला पर्याय आहे. कपाटात कितीही कपडे असले तरी नवीन फॅशनचे कपडे कोणाला आवडत नाहीत. आपल्या बहिणीच्या आवडीच्या रंगाचा ड्रेर साडी, जिन्स,टॉप,ओढणी, स्कार्फ, स्कर्ट, असे पर्याय आपल्या बजेटनुसार निवडू शकता. आतातर ऑनलाईन स्टोअरवर चांगाल सेल सुरु आहे. त्याचा फायदा घेऊन कमी बजेटमध्ये चांगलं गिफ्ट देऊ शकता.
  Published by:News18 Desk
  First published: