नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : साधी पोटदुखी, डोकेदुखी, अंगदुखी सारख्या आचारात लगचेचं डॉक्टर (Doctor) गाठतो किंवा गोळ्या औषधं (Medicine) घ्यायला सुरूवात करतो. पण, अनेक आजरांवर आयुर्वेदिक औषधं (Ayurvedic Medicine) उपयोगी असतात. मोठे आजारसुद्धा आयुर्वेद बरं करू शकतो. आयुर्वेदात औषधी म्हणून हजारो वर्षांपासून त्रिफळा (Triphala) चुर्ण वापरलं जातं. आवळ, हिरडा आणि बेहडा याची पावडर एकत्र करून त्रिफळा चुर्ण तयार होतं. याचे एवढे फायदे (Benefits) आहेत की बऱ्याचं घरांमध्ये औषधी म्हणून वापर केला जातो.
याला पॉली हर्बल मेडिसिनही (Poly Herbal Medicine) म्हणतात. पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर (Beneficial For Healthy Stomach & Weight loss) असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे. हे एक शक्तिशाली डिटॉक्सिफायर (Powerful Detoxifier) म्हणून देखील काम करतं. पोट, लहान आतडं आणि मोठे आतडं डिटॉक्स (Detox) करतं. दररोज वापरल्याने कोणते फायदे होतात पाहूयात.
(युरिक अॅसिडच्या त्रासात वापरा ‘हे’ गोड औषध; संपेल सगळा त्रास; संशोधकांचा दावा)
त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदेपोटासाठी फायदेशीर
त्रिफळा हे कोलन टोनर म्हणून ओळखले जातं. याने शरीरातील कोलनला शक्ती वाढते. यामुळे पाचनशक्ती निरोगी राहते. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर, हे चुर्ण नक्की घ्या. यामुळे पोट साफ न होण्याची समस्या संपते.
(UPSCच्या तयारीसाठी वडिलांनी विकलं घर; प्रदीप सिंहांनी IAS होऊन कष्टाचं केलं चीज)
इम्फ्लामेशन कमी करतं
त्रिफळामधील अॅन्टी-ऑक्सिडन्ट्सने अनेक आजारांपासून बचाव होतो. फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतं आणि आपल्याला इम्फ्लामेशनपासून दूर ठेवतं. मधुमेह,कर्करोग आणि हृदयरोगापासून संरक्षणासाठी त्रिफळा नियमित घ्यायला हवा.
(‘हा’ मित्र कधीच सोडणार नाही साथ; एकटेपणा कायमचा होईल दूर)
त्वचेसाठी फायदेशीर
त्रिफळा चुर्ण खाण्याने त्वचेलाही फायदा होतो. यातील अॅन्टी-ऑक्सिडन्ट्सने आणि अॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री घटक त्वचेच्या समस्यांपासून बचाव करतात आणि स्किन सेल्सचं संरक्षण करतात.
(दररोज घ्या Apple Cider Vinegar; एका महिन्यात वजन होईल कमी)
स्ट्रेस आणि एन्जायटी कमी करतात
त्रिफळा चुर्ण घेतल्याने मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. तणाव आणि चिंतामुक्त जगण्यासाठी त्रिफळाचा फायदो होतो हे संशोधनांने सिद्ध झालं आहे. मूड चांगला राहण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayurved, Ayurvedic medicine, Health Tips, Lifestyle, Skin care