मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला वितळलेलं मेण; तरुणाची झाली भयंकर अवस्था

अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला वितळलेलं मेण; तरुणाची झाली भयंकर अवस्था

तोंडात मेण ओतलं आणि...

तोंडात मेण ओतलं आणि...

झोपेत पाणी प्यायला उठला पण त्यानंतर त्याची झोपच उडाली.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 ऑगस्ट : रात्री झोपल्यानंतर तहान लागली आणि आपण पाणी पिण्यासाठी (Drinking water) उठलो तरी आपल्या डोळ्यांवर झोप असते. किती तरी जण डोळे न उघडताच पाणी पितात (Drinking water at night) आणि असंच करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. त्याला मध्यरात्री तहान लागली आणि झोपेतच तो पाणी समजून चक्क वितळलेलं मेण प्यायला (Thirsty man drinks candle wax). त्यानंतर त्याची भयंकर अवस्था झाली.

पाणी प्यायल्यानंतर या व्यक्तीची झोप कायमची उडाली. कारण तो जे प्यायला ते पाणी नव्हतं तर चक्क मेण होतं. पाण्याऐवजी मेण पिणाऱ्या या व्यक्तीने स्वतः सोशल मीडियावर आपला हा विचित्र किस्सा सांगितला आहे.

हे वाचा - नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम

रेडिटवर या व्यक्तीने सांगितलं, की तो आपल्या बेडजवळ टेबलवरच पाण्याची बाटली ठेवतो. त्याने डोळे बंद करूनच हाताने बाटली उचलली. पण त्याने बाटली म्हणून जे उचललं ती बाटली नाही तर मेणबत्ती होती, ज्यावरील मेण वितळलं होतं. डोळे न उघडताच त्याने ते मेण आपल्या तोंडात ओतलं.

आता मेण म्हणजे ते काही वेळातच गोठतंही. ही व्यक्ती मेण प्यायली आणि ती त्याच्या तोंडात गोठली (Wax Coating In Mouth) . त्याचे दात आणि तोंडाच्या वरच्या भागावर चिकटली. यामुळे त्याचं तोंड उघडतही नव्हतं आणि ना बंद करता. त्यानंतर त्याने कसंबसं मेण आपल्या तोंडातून बाहेर काढलं.

हे वाचा - Yuck! डोकं फिरलंय का हिचं? सुपरमार्केटमध्ये महिलेचं घाणेरडं कृत्य; VIDEO VIRAL

त्याने आपला हा विचित्र किस्सा सांगताच नेटिझन्सनीही त्याची मजा घेतली. मेणाची चव कशी लागते, असं काही जणांनी त्याला विचारलं. तर काही युझर्सनी या व्यक्तीने आपलं तोंड वॉटरप्रुफ बनवलं असं म्हटलं.

First published:

Tags: Drink water, Lifestyle, Water