Home /News /lifestyle /

'मुलीला शाळेत पाठवत नाही, कितीही टीव्ही पाहू देते', या आईची वागणूक पाहून नेटकरी भडकले

'मुलीला शाळेत पाठवत नाही, कितीही टीव्ही पाहू देते', या आईची वागणूक पाहून नेटकरी भडकले

'मी माझ्या मुलीचं अतिशय अपारंपरिक आणि वादग्रस्त पद्धतीनं संगोपन करते. तिच्या झोपेची, तसंच झोपेतून उठण्याची वेळ मी निश्चित केलेली नाही.

'मी माझ्या मुलीचं अतिशय अपारंपरिक आणि वादग्रस्त पद्धतीनं संगोपन करते. तिच्या झोपेची, तसंच झोपेतून उठण्याची वेळ मी निश्चित केलेली नाही.

'मी माझ्या मुलीचं अतिशय अपारंपरिक आणि वादग्रस्त पद्धतीनं संगोपन करते. तिच्या झोपेची, तसंच झोपेतून उठण्याची वेळ मी निश्चित केलेली नाही.

    मुंबई, 03 डिसेंबर : मुलांना घरात आणि शाळेत शिस्तीचे (Discipline) धडे दिले जातात. मुलांच्या प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट वेळ निश्चित केली जाते. मुलांना न थकता नव्या गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता याव्यात यासाठी खेळण्याची, अभ्यासाची आणि झोपेची वेळ निश्चित केली जाते. अलीकडेच टिकटॉकवर (Tik Tok) एका आईनं तिच्या 10 वर्षांच्या मुलीला शिस्त नावाची गोष्ट शिकवलेलीच नाही, असं सांगून वाद निर्माण केला आहे. @treeflower नावाच्या टिकटॉक युझरने एक व्हिडिओ (Video) शेअर करून सांगितलं, की 'मी माझ्या मुलीचं संगोपन अगदी अपारंपरिक पद्धतीनं करते.' त्यांनी त्यांच्या मुलीची झोपण्याची वेळ ठरवलेली नाही किंवा त्या तिला अभ्यासासाठी (Study) आग्रह देखील करत नाहीत. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या मुलीला अद्याप शाळेतही (School) पाठवलेलं नाही, असंदेखील त्यांनी सांगितलं. त्यांचं हे वक्तव्य ऐकून इंटरनेट युझर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. डॉक्टर थेट WhatsApp वर उपलब्ध; फक्त ‘Hi’ पाठवा अन् विनामूल्य तज्ज्ञांचा सल्ला या व्हिडिओत आई सांगते, की, 'मी माझ्या मुलीचं अतिशय अपारंपरिक आणि वादग्रस्त पद्धतीनं संगोपन करते. तिच्या झोपेची, तसंच झोपेतून उठण्याची वेळ मी निश्चित केलेली नाही. काही वेळा तर ती पहाटे 5 वाजता झोपते आणि सायंकाळी 4 वाजता उठते. ती कधीच शाळेत गेलेली नाही. तिला जे आवडतं तेच ती वाचते किंवा त्याचाच अभ्यास करते. मी माझ्या 10 वर्षांच्या मुलीसाठी स्क्रीन-टाइम देखील निश्चित केलेला नाही. ती तिच्या मर्जीनुसार, हवं तेव्हा काहीही पाहू शकते. आम्ही कोणीही एकमेकांसाठी जागरण करत नाही. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या आणि स्वतःचं मत असणाऱ्या मुलीचं संगोपन मी करते.' अस्सं लग्न नको गं बाई! असं काही घडलं की मंडपातच चक्कर येऊन कोसळली नवरी ही महिला या व्हिडिओत स्वतःला 'क्रंची मदर' (Crunchy Mother) असं संबोधते. ही संज्ञा निसर्गवादावर अधिक अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी वापरली जाते. यात औषधं न घेणं किंवा विनाउपचार बाळास जन्म देणं, मूल नकार देत नाही तोपर्यंत स्तन्यपान देणं, एकत्र झोपणं, अटॅचमेंट पॅरेंटिंग आणि घरीच मुलांना शिक्षण देणं याचा समावेश असतो. हा व्हिडिओ आतपर्यंत 8 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. यावर या मुलीला मूलभूत शिक्षण मिळत नाही, अशी प्रतिक्रिया युझर्स देत आहेत. ही मुलगी जगण्यासाठी सक्षम होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. ही मुलगी सर्वसामान्य जीवनापासून दूर असून, तिच्या भविष्याची चिंता वाटते, असंदेखील काहींनी म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Discipline, School, Tik tok, Video

    पुढील बातम्या