मराठी बातम्या /बातम्या /Viral /अस्सं लग्न नको गं बाई! असं काही घडलं की मंडपातच चक्कर येऊन कोसळली नवरी

अस्सं लग्न नको गं बाई! असं काही घडलं की मंडपातच चक्कर येऊन कोसळली नवरी

लग्नाच्या दिवशी तिच्यासोबच इतक्या विचित्र घटना घडल्या. ज्यामुळे ती आपलं लग्न कधीच विसरू शकत नाही.

लग्नाच्या दिवशी तिच्यासोबच इतक्या विचित्र घटना घडल्या. ज्यामुळे ती आपलं लग्न कधीच विसरू शकत नाही.

लग्नाच्या दिवशी तिच्यासोबच इतक्या विचित्र घटना घडल्या. ज्यामुळे ती आपलं लग्न कधीच विसरू शकत नाही.

वॉशिंग्टन, 03 डिसेंबर : आपलं लग्न (Wedding) हटके आणि अविस्मरणीय व्हावं असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. त्यामुळे किती तरी दिवस लग्नाची तयारी केली जाते. पण ऐन लग्नात (Wedding story) असं काही घडतं की स्पेशल प्लॅनिंगमुळे नाही तर त्याच अचानक घडलेल्या घटनेमुळे लग्नाचा तो क्षण आयुष्यभर लक्षात राहतो (Worst wedding). लग्नाचा असाच विचित्र अनुभव आला तो अमेरिकेतील एका तरुणीला (Bride).

22 वर्षीय तरुणीने आपल्या लग्नाचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. टिकटॉकवर तिने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. लग्नामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे या तरुणीला मंडपातच चक्कर आली आणि बेशुद्ध होऊन ती आपल्या नवरदेवावर कोसळली. होली लिनिया-कोलेंडा डारनेल असं या तरुणीचं नाव आहे.

मिनेसोटाच्या मिनियापोलिसमध्ये राहणाऱ्या होलीचं जॅक्सनसोबत फ्लोरिडामध्ये लग्न झालं. पण लग्नाच्या दिवशी तिच्यासोबच विचित्र घटना घडल्या. ज्या ती कधीच विसरू शकत नाही.

हे वाचा - OMG! World Record साठी तरुणीचे एकाच दिवसात 900 पुरुषांसोबत संबंध

डेली मेलच्या रिपोर्टनुसार लिनियाने सांगितलं, लग्नाच्याच दिवसाची सुरुवात खूप चांगली झाली. पण थोड्या वेळाने तिची तब्येत अचानक बिघडू लागली. लग्नामध्ये जेव्हा पादरी लग्नाचे वचन सांगत होते, तेव्हाच तिला चक्कर आली आणि ती आपल्या नवऱ्यावरच कोसळली. लिनियाने याचा व्हिडीओही आपल्या टिकटॉक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तिच्या नवऱ्याने तिला सावरलं आणि ठिक आहेस का म्हणून विचारलं.

लिनिया म्हणाली की तिने सकाळीच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपली तब्येत ठिक नसल्याचं सांगितलं. पण त्याने ते गांभीर्याने घेतलं नाही. ती मस्करी करत असावी असंच त्याला वाटलं. त्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या. तेव्हा ती उलटी करत होते तेव्हा तिच्या पुतण्याने तिच्या ड्रेसवर शी केली आणि तिचा पूर्ण ड्रेस खराब झाला.  त्यावेळी मला सर्वकाही एका भयानक स्वप्नासारखं वाटत होतं.

हे वाचा - आता कुणीच सिंगल राहणार नाही! फक्त बाटली उघडताच मिळेल परफेक्ट लाइफ पार्टनर

लिनियाला नंतर डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा तिचं ब्लड प्रेशर आणि आयर्न कमी झालं होतं, त्यामुळेच तिला चक्कर आणि उलटी होत होती, असंही ती म्हणाली.

First published:

Tags: America, Lifestyle, Wedding