नवी दिल्ली, 16 मे : भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. विशेषतः उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेचा प्रकोप अधिक आहे. कडक उन्हाचा सामना करणं हे केवळ आपल्यासाठीच नाही तर आपल्या वाहनांसाठीही आव्हान आहे. अशा परिस्थितीत उन्हात कार पार्क करणे आणि उन्हात प्रवास करणे याचा तुमच्या कारवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जास्त काळ उच्च तापमानाच्या संपर्कात राहिल्याने तुमच्या कारचे नुकसान होऊ (Summer car care) शकते.
तुम्हीही अनेकदा कडक उन्हात प्रवास करत असाल किंवा उन्हात कार पार्क करत असाल तर तुम्ही तुमच्या कारची अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, उष्णतेमुळे तुमच्या कारमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. येथे आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमची कार पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकता.
उन्हात पार्किंग करताना काळजी घ्या -
उन्हाळ्यात नेहमी सावलीत कार पार्क करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु, उन्हात पार्क केल्याशिवाय पर्यायच नसेल तेव्हा खिडक्या किंचित खाली ठेवा, जे क्रॉस-व्हेंटिलेशनमध्ये मदत करते आणि केबिनमधून गरम हवा काढून टाकण्यास मदत होते. याशिवाय, कार उन्हात असताना खिडक्यांवर सनशेडचा वापर करू शकता.
एसीची सर्व्हिस करून घ्या -
कार मालकांची उन्हाळ्यात एक कॉमन तक्रार असते की, त्यांच्या कारच्या एअर कंडिशनरद्वारे केबिन थंड होण्यासाठी खूप वेळ लागतो. तुमचे एसी युनिट कितीही शक्तिशाली असले तरीही, कारमध्ये अडकलेल्या सर्व उष्णतेमुळे, विशेषत: थेट सूर्यप्रकाशात पार्क केल्यावर तर वेळ लागतो. हे टाळण्यासाठी, एकदा तुम्ही कारमध्ये प्रवेश केल्यानंतर, प्रथम खिडक्या खाली करा आणि उष्णता बाहेर पडू द्या.
टायरमधील हवा तपासा -
तुम्ही तुमच्या गाडीच्या टायरचा दाब वेळोवेळी तपासावा. कारण उन्हाळ्यात टायरमध्ये दाब जास्त असेल तर टायर फुटण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर उन्हाळ्यात टायरचा दाब कमी ठेवावा. गाडी रस्त्यावर धावत असताना टायर आणि रस्ता यांच्यात घर्षण होते. यामुळे उष्णता निर्माण होते. जर तुमचा टायरचा दाब खूप जास्त असेल तर त्यामुळे टायर फुटू शकतो.
हे वाचा - केसांच्या सगळ्या समस्यांवर एकमेव जालीम उपाय; काळे हरभरे अशा पद्धतीनं वापरून बघा
कूलंट तपासत रहा -
कूलंट कारला थंड ठेवण्याचे काम करते. म्हणूनच उन्हाळ्याच्या कारमध्ये कूलंटचे प्रमाण परिपूर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. बरेचदा लोक कूलंटऐवजी रेडिएटरमधील पाणी वापरतात, जे थोड्या काळासाठी ठीक आहे, परंतु जर ते जास्त काळ ठेवले गेले तर ते हानिकारक ठरू शकते.
हे वाचा - आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य
रेडिएटर फॅन तपासत रहा
कारच्या रेडिएटरसह स्थापित केलेला पंखा देखील तपासा. कारण अनेक वेळा पंखा न चालल्यास गाडी जास्त गरम होऊन बंद पडते. त्यामुळे या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची कार तुम्हाला या दिवसातही चांगला अनुभव देईल. तुम्ही तुमच्या कारमध्ये या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास उन्हाळ्यात कार कधी दगा नाही देणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Burning car, Car