जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mango Tips: आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य

Mango Tips: आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य

Mango Tips: आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य

आंबा वजन कमी करतो की नाही यावर तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काहीजण म्हणतात की आंब्यामध्ये असे अनेक पोषक आणि गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यास मदत करतात, तर काहींचे म्हणणे आहे…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मे : उन्हाळ्यात फळांचा राजा आंब्याची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा केवळ गोड आणि चवदारच नाही तर आरोग्यदायीही आहे. आंब्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वांची चव वेगवेगळी आहे. रसाळ फळ आंबा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आंब्याचे नियमित सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. यासोबतच हृदय, पचन, डोळे, मेंदू इत्यादीही निरोगी ठेवते. आंबा कॅन्सरसारख्या घातक आजारापासून संरक्षण करतो. एवढेच नाही तर आंबा वजनही कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही, दिवसातून किती आंबे खाणे आरोग्यासाठी चांगले असतात. आंब्यामध्ये पोषक तत्व - कॅलरी, कार्बोहायड्रेट्स, फॅट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, साखर, प्रथिने, ऊर्जा, फोलेट, तांबे, जीवनसत्त्वे ए, बी-6, बी-12, सी, ई, व्हिटॅमिन यांसारखी अनेक प्रकारची पोषक तत्त्वे आंब्यात असतात. के, व्हिटॅमिन डी, झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर, नियासिन, थायमिन इ. आंबा खाल्ल्याने वजन कमी होते का? TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आंबा वजन कमी करतो की नाही यावर तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काहीजण म्हणतात की आंब्यामध्ये असे अनेक पोषक आणि गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यास मदत करतात, परंतु काहीजण याशी सहमत नाहीत आणि काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आंब्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी चांगले नाही. हे फळ इतर ऋतूंमध्ये मिळत नसल्याने लोक उन्हाळ्यात याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू लागतात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. एका अभ्यासानुसार, 27 सहभागींनी 12 आठवडे 100 kcal असलेले ताजे आंबे खाल्ले. याने रक्तातील ग्लुकोज, सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन आणि एकूण अँटिऑक्सिडंट क्षमतेत लक्षणीय वाढ झाली. एवढेच नाही तर आंबा खाल्ल्यानंतर शरीराचे वजन, चरबीची टक्केवारी, इन्सुलिन किंवा लिपिड प्रोफाइल, रक्तदाब यामध्ये विशेष बदल झाला नाही. अभ्यासात, आंबा खाल्ल्यानंतर जास्त वजन आणि लठ्ठ प्रौढांमध्ये कार्डिओमेटाबॉलिक जोखीम घटक निश्चितपणे दिसून आले. आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही, तर वाढते, असेही काही तज्ज्ञ सांगतात. वास्तविक, आंब्यामध्ये कॅलरी आणि कार्ब जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते. हे वाचा -  जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट जाणून घ्या मधुमेहींनी आंबा खावा का? मधुमेही रुग्णही आंबा खाऊ शकतात, पण जास्त प्रमाणात नाही, मर्यादित प्रमाणात, अन्यथा साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असल्यामुळे मधुमेहामध्ये आंबा कमी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 51 आहे, जो कमी आहे, परंतु मधुमेह नसलेल्या पदार्थांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आरोग्य तज्ज्ञ मधुमेहींना हे सल्ला देतात की, ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा जास्त असलेले पदार्थ खाऊ नयेत. हे वाचा -  लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत दिवसात किती आंबे खाऊ शकतो? काही लोकांना आंबे इतके आवडतात की ते एका दिवसात 5-6 आंबे खातात, परंतु असे करणे योग्य नाही. विशेषत: मधुमेह, लठ्ठ रुग्णांनी आंबा खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तज्ञांच्या मते, दररोज 2 कप किंवा 350 ग्रॅमपेक्षा कमी आंबा खावा. 100 ग्रॅममध्ये सुमारे 60 कॅलरीज असतात आणि संपूर्ण आंब्यामध्ये सुमारे 202 कॅलरीज असतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही, हे उपाय करण्यापूर्वी तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात