Home /News /lifestyle /

Black gram: केसांच्या सगळ्या समस्यांवर एकमेव जालीम उपाय; काळे हरभरे अशा पद्धतीनं वापरून बघा

Black gram: केसांच्या सगळ्या समस्यांवर एकमेव जालीम उपाय; काळे हरभरे अशा पद्धतीनं वापरून बघा

काळा हरभरा फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. याशिवाय काळ्या हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, मँगनीज, झिंक आणि लोहही मुबलक प्रमाणात आढळते.

    मुंबई, 15 मे : उकडलेल्या हरभर्‍यांची भाजी आणि भिजवलेले हरभरे हा अनेकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असतो. प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध हरभरा खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पण, कदाचित अनेकांना माहीत नाही की, काळे हरभरे (Black gram) केसांवरही खूप गुणकारी आहेत. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी काळ्या हरभऱ्यांचा वापर करून आपण केसांच्या अनेक समस्या कमी करू (Black gram on hair problems) शकतो. वास्तविक, काळा हरभरा फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. याशिवाय काळ्या हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, मँगनीज, झिंक आणि लोहही मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे केस पूर्णपणे प्रॉब्लेम फ्री करून केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी काळे हरभरे खूप उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊया केसांवर काळ्या हरभऱ्याचा वापर आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे काय आहेत. पांढरे केस कमी होतील - पांढऱ्या केसांची समस्या आजकाल अनेकांना दिसून येते. पांढरे केस होऊ नयेत यासाठी काळ्या हरभऱ्यांचे सेवन आपल्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. यामध्ये असलेले प्रोटीन आणि मँगनीज केस पांढरे होण्यापासून रोखतात. केस गळतीवर नियंत्रण - तुम्ही केसगळतीने त्रस्त असाल तर काळ्या हरभऱ्याचा हेअर मास्क तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासोबतच काळ्या हरभऱ्याचे सेवन शरीरातील झिंक आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता पूर्ण करून केस गळती कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. डोक्यातील कोंडा घालवा - काळ्या हरभऱ्यामुळे डोक्यातील कोंडाही सहज घालवता येऊ शकतो. यासाठी काळे हरभरे बारीक करून पावडर बनवावी. 4 चमचे काळ्या हरभऱ्याच्या पावडरमध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा. ते टाळूवर लावा आणि थोड्या वेळाने स्वच्छ धुवा. यामुळे केसांचा कोंडा कमी होईल. हे वाचा - 16 मे रोजी आहे पहिलं चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी चुकूनही करू नयेत ही 5 कामं मऊ केसांचे गुपीत - काळ्या हरभऱ्याचा हेअर मास्क वापरूनही आपण केसांच्या कोरडेपणा घालवू शकता. यासाठी 1 अंडे, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचे दही 2 चमचे काळ्या हरभऱ्याची पावडर घाला. आता या गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि केसांना लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवा. अशा पद्धतीनं वापरल्यास केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील. हे वाचा - लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत केसांची चांगली वाढ - झिंक आणि व्हिटॅमिन बी 6 समृद्ध असलेले काळे हरभरे केसांच्या वाढीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. तसेच हरभऱ्यामध्ये असलेले प्रोटीन नवीन केस वाढवण्याचे काम करतात. काळ्या हरभऱ्याचे सेवन करून आणि त्याचा हेअर मास्क लावून तुम्ही तुमचे केस लांब आणि दाट करू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Health, Lifestyle, Woman hair

    पुढील बातम्या