कानातल्या मळाला त्रासलात? काय काय उपाय आहेत पाहा; मायक्रोसक्शन आहे सर्वात प्रभावी

कानातल्या मळाबद्दल ऐकल तरी आपल्याला घाण वाटायला लागते.

कानामध्ये मळ (Earwax) जास्त प्रमाणात साठला तर कानात वेदना (Paining) होतात किंवा काहींना कमी ऐकायला येतं. हा मळ काढायला अगदी तेल घालण्यापासून ते मायक्रोसक्शनपर्यंत अनेक उपाय केले जातात. कुठले धोक्याचे आणि कुठले सुरक्षित पाहा..

  • Share this:
    दिल्ली,21 जून : आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या (Naturally) असे अनेक स्त्राव पाझरत असतात ज्याची आपल्याला माहितीही नसते. पण, हे स्त्राव शरीरात पाझरणं आवश्यक असतं. आपल्या कानातील ग्रंथीममधून (Ear Glands)असाच स्त्राव पाझरत असतो. हा स्त्राव साठल्यानंतर मळाच्या रुपात बाहेर पडतो. कान स्वच्छ आणि चांगले राहण्यासाठी कानात साठणारा हा स्त्राव उपयोगी येतो. कानामधील त्वचा सूकण्यापासून (Skin Dry) आणि भेगा पडण्यापासून वाचवतं. शिवाय हवेमुळे कानात धुळीच कणं किंवा पाणी जाण्यापासून बचाव होतो. कानातला मळ किंवा इयरवॅक्स (Earwax) आपोआप निघतो. तर कधीकधी कानात साठलेला मळ काढावा लागतो. पण, कानातल्या मळाबद्दल ऐकल तरी आपल्याला घाण वाटायला लागते किंवा आपोआप आपली बोटं कानाकडे वळतात मात्र या सवयीने नुकसान होऊ शकतं. (तुम्हालाही आहे हेअरबॅण्ड मनगटावर बांधायची सवय? होतील गंभीर परिणाम) कानामधील मळ आपल्या जबड्याच्या हालचालींमुळे निघून जातो. मात्र कानामध्ये मळ जास्त प्रमाणात साठला तर, अडचणी वाढतात. कानात वेदना होतात किंवा काहींना कमी ऐकायला येतं. आजकाल मेडीकलमधील काही वस्तूंमुळे सोप्या पद्धतीने मळ काढता येतो. (International Yoga Day: साक्षात माधुरी दीक्षितबरोबर करा दररोज योगा; पाहा VIDEO) कॉटन बड्स बड्सने कानामधील मळ काढायची सवय बऱ्याच जणांना असते. पण, बड्समुळे कानातला मळ निघण्याऐवजी आणखीन आतमध्ये जातो. बड्सवरील बॅक्टेरीयामुळे कानाला इन्फेक्शन होतं. त्यामुळे कानात जळजळ होते. बड्स जास्त आत गेल्यास कानाचा पडदा फाटू शकतो. त्यामुळे कान दुखून रक्त येऊ शकतो. इयर कॅन्डल इयर कॅन्डल हा प्रकारही आता वापरात आहे. यात एक प्रकाराची मेणबत्ती कानाच्या वरच्या भागात ठेवली जाते. याने कान साफ होतो असा दावा असला तरी, त्यामुळे काहीच उपयोग होत नसल्याचा दावा काही संशोधकांनी केला आहे. यामुळे चेहरा जळू शकतो   शिवाय जळत्या मेळबत्तीमुळे कानातल्या नसा जळू शकतात. (लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा) ईयर ड्रॉप कानातला मळ साफ करण्यासाठी ईयर ड्रॉप वारला जातो. हायड्रोजन पॅरॉक्साईड,सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराईड सारख्या रसायनांपासून हे ईअर ड्रॉप बनवातात. त्यामुळे कानात कडक झालेला मळ नरम होतो आणि काढता येतो. कधीकधी याचाही त्रास होऊ शकतो. तेल कानातला मळ काढण्यासाठी काही लोक तेलाचाही वापर करतात. त्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरणं चांगलं. ऑलिव्ह ऑईल गरम करून त्याचे काही थेंब कानात टाका. थोडावेळ त्याच कुशीवर झोपा. यामुळे कानात जळजळ होणार नाही. (Ease Of Living Index: भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कुठलं? पाहा मुंबई कुठे?) पाण्याचा वापर कान साफ करण्यासाठी पाणी वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याला सिरिंजिंग म्हणतात. या प्रकारात कानामध्ये पाण्याचा फवारा सोडला जातो. यामुळे ईयर व्हॅक्स निघतो. मात्र कधीकधी त्यामुळे कानाचा पडदा फाटण्याची शक्यता असते. मायक्रोसक्शन मायक्रोसक्शन पद्धत सर्वात उपयोगी आणि सुरक्षित आहे. या करता मायक्रोस्कोपने डॉक्टर कानाचं निरीक्षण करतात आणि एका छोट्या उपकरणाने मळ काढतात. ही पद्धत सर्वात सोपी मानली जाते त्यामुळे रुग्णाला जास्त त्रास होत नाही.
    Published by:News18 Desk
    First published: