दिल्ली, 19 जून : आंतरराष्ट्रीय योग दिनाची (International Yoga Day) उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे. दरवर्षीपेक्षा हा योग दिन वेगळा असणार आहे. जगभरात साजरा होणारा हा दिवस कोरोनामुळे घरात राहुनच साजरा करावा लागणार आहे. आता संपूर्ण जगाने योगाचं महत्व (Important of Yoga) ओळखलेलं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटीसुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात योगासनांनी करतात. सर्वांची लाडकी अभिनेत्री माधूरी दीक्षित-नेने (Madhuri Dixit Nene) यासुद्धा आपल्या फॅन्ससाठी योगासनं, वर्काऊट, आहार याचं महत्व सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सांगत असतात. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी (International Yoga Day) आपल्या चाहत्यांना विविध योगासनं शिकवण्यासाठी काही व्हीडिओ **(Video)**तयार केले आहेत. त्यातला पहिला व्हीडिओनंतर आता त्यांनी आणखीन 3 व्हीडिओ इन्स्टग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. दरवर्षी 21 जूनला जागतिक योग दिन (World Yoga Day) साजरा केला जातो. कोरोनामुळे सध्या योग दिवस आपल्या घरातच साजरा करण्याची वेळ आली असली तरी, आपण घरातचं राहून काही सोपी योगासन करून हा दिवस साजरा करू शकतो असा संदेश त्यांनी दिला आहे.
त्यांनी योगासनांची एक सीरीज सुरू केली आहे. त्यात पहिलं आसन भूजंगासन (Bhujangasan) शेअर केलं होतं. आता माधुरी दीक्षित यांनी धनुरासन योगमुद्रा आणि तुलासन करतानाचे व्हीडिओ पोस्ट करत त्यासोबत त्याचे फायदेही सांगितले आहेत. धनुरासन नियमीत केलं तर, पोटाशीसंबंधीत त्रास दूर राहतात. मात्र पोटाच्या अल्सरचा त्रास असेल तर, हे आसन करू नये. योगमुद्रा आसन पोट आणि पाठीसाठी फायदेशीर आहे. तर, तुलासन केल्याने हाड, खांदे यांचे स्नायू मजबूत होतात.
आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी (International Yoga Day) अभिनेत्री माधूरी दीक्षित-नेने यांनी व्हीडिओ **(Video)**तयार केले आहेत. त्यातला पहिला व्हीडिओ त्यांनी इन्स्टग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.
त्यानंतर आणखीन 3 व्हीडिओ त्यांनी पोस्ट केले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी त्यांनी सुरू केलेली नवीन सीरिज सध्या चर्चेत आहे.