दिल्ली, 20 जून: बऱ्याचवेळा मुलींना हेअरबॅन्ड (Hairband on wrist) हातात घालण्याची सवय आहे. काही मुलींना ही स्टाईल (Style) वाटते तर, बर्याचजणी हेअरबॅन्ड इकडेतिकडे हरवायला नको म्हणून हाताला बांधतात. पण, या सवयीने नुकसान होऊ शकतं हे माहिती आहे का? हेअरबॅन्ड हातात बांधण्याचे बरेच दुष्परिणाम (Side Effect) आहे. चांगल्या प्रतीचा हेअर बॅन्ड न वापरल्यास केसही कमकुवत (Hair Damage) होतात. आजकाल मुलींच्या हेअर स्टाईल बदलल्या आहेत. हल्ली मुली केस फार वरती बांधतात किंवा सगळे केस एकत्र करून हाय पोनीटेल बांधतात. पण, केस बांधण्यासाठी चांगल्या क्वालिटीचा रबरबॅन्ड, किंवा हेअरबॅन्ड न वापरल्यास केसांच फार नुकसान होतं. केस तुटता किंवा गळायला लागतात. शिवाय केसांवर ताण आल्याने डोकंही दुखायला लागतं. ( वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात गमावला जीव; 351 फूट उंच बाईक उडवताना भयंकर मृत्यू ) त्याचप्रकारे हेअरबॅन्ड जास्त घट्ट असेल किंवा लहान असेल तर, हातावरील नसांवर त्याचा दाब झाल्याने रक्तप्रवाह अडकतो. हेअरबॅन्ड हातावरून काढताना मनगटावर लाल रंगाचा चट्टा पडतो आणि त्यावर आगही होते. दररोज हेअरबॅन्ड मनगटावर बांधायची सवय असेल तर, प्रेशर वाढतं आणि एक्युट कम्पार्टमेन्ट सिंड्रोमचा त्रास होतो. मनगटावर सतत बॅन्ड (Hairband) बांधत असाल तर, गाठ होते. त्यावर बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial Infection) होऊ शकतं. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इन्फेक्शन वाढलं तर, सर्जरी करायची वेळही येऊ शकते. ( काळ्या मिरीचा हा उपयोग माहिती झाला की, हेअर डाय वापरणं सोडून द्याल ) यातून वाचायचं असेल तर, हेअरबॅन्ड मनगटावर बांधणं बंद करा. चांगल्या क्वालिटीचा रबर वापरा. केस जास्त घट्ट बांधू नका. थोड्या दिवसांनी हेअर स्टाइल बदलत रहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.