मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Inspiration: लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा

Inspiration: लाखोंचा पगार सोडून करत आहे देशसेवा; IAS अधिकारी नेहा भोसलेंची यशोगाथा

नेहा भोसले UPSC परीक्षेत राज्यातून पहिल्या आल्या आहेत.

नेहा भोसले UPSC परीक्षेत राज्यातून पहिल्या आल्या आहेत.

MBA नंतर नेहा भोसले (Neha Bhosle) यांना एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. UPSC अभ्यासाला वेळ मिळत नाही म्हणून 2017 ला नोकरी सोडली. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. पण नंतर त्या महाराष्ट्रात पहिल्या आल्या.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 20 जून : अनेक लोकांना आयुष्यामध्ये काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा असते. मनाशी ध्याय धरून कोणतही काम केलं तर, त्यात यशही मिळत. काही लोक तर, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी हातामधील काही संधी सोडून देतात मात्र, स्वतःवरचा विश्‍वास आणि मेहनत त्याच्या बळावर स्वतःचं स्वप्न साकार करतात. UPSC परीक्षेमध्ये यश मिळवून IAS होण्याचं स्वप्न पूर्ण करणारे असेच ध्येय्यवेडे असतात. UPSC परीक्षेची तयारी देशभरातील लाखो विद्यार्थी करतात मात्र, फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये (UPSC Exam) यश मिळतं.

यावर्षी महाराष्ट्रातील (Maharashtra) मुलामुलींनी UPSC परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं आहे. यावर्षी मुंबईच्या नेहा भोसले (Neha Bhosle) राज्यातून पहिल्या आल्या आहेत. त्यांनी या परीक्षेत 15 वा आणि महाराष्ट्रात पहिल क्रमांक मिळवला आहे.

(IAS ऑफिसर बनण्यासाठी सोडलं इंजीनियरिंगच शिक्षण; सिमी करण यांच्या यशाचा प्रवास)

मूळच्या मुंबईची असलेल्या नेहा यांचं शिक्षण मुंबईतच झालंय. त्यानंतर त्यांनी IIIM लखनौ मधून MBA केलंय. MBA नंतर त्यांनी एका खासगी कंपनीत 3 वर्षे काम केलं. कामामुळे अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने 2017 ला नोकरी सोडून नेहा यांनी पूर्णवेळ अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं नाही. मात्र तरी देखील त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.

(जिद्दीला सलाम! हार न मानता दिली 5 वेळा UPSCची परीक्षा)

नेहा भोसले यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि 15वा रँक मिळवाल. आता त्या  IAS अधिकारी बनल्यात. नेहा भोसले सांगतात, UPSC परीक्षामध्ये पास व्हायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागते. परीक्षेसाठी योग्य रणनिती आणि टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. योग्य पद्धतीने प्रयत्न केले तयारी केली तर, यश मिळतंच.

(वाऱ्याच्या वेगाने हवेत उडत वर्ल्ड रेकॉर्ड; रिअल लाइफमधील SUPERMAN पाहिलात का?)

अपयशाने खचून न जाण्याचा सल्ला देखील नेहा भोसले देतात. नेहा भोसले यांच्या मते दहावी आणि बारावीच्या पुस्तकांचा  UPSCच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. शिवाय नोट्सलाही त्यां महत्त्व देतात. त्या सांगतात नोट्समुळे रिविजनसाठी खूप फायदा होतो.

First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Success, Success stories, Success story