मुंबई, 2 सप्टेंबर: टीव्ही अभिनेता आणि Bigg Boss फेम सेलिब्रिटी सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla death at 40) वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे (Hearth Attack reasons) निधन झालं. या धक्कादायक एक्झिटमुळे बॉलिवूडसह सामान्य जनांनाही धक्का बसला आहे. सेलेब्रिटी त्यांच्या फिटनेससाठी (celebrity fitness rourine) जागरुक असतात. काटेकोर आहार, नियमित व्यायाम हा त्यांच्या रूटीनचा भाग असतो. शिवाय सिद्धार्थ तणावाखाली नव्हता, हेही त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे. असं असताना एक ठणठणीत माणूस अचानक कसा काय मृत्युमुखी पडतो? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.
उत्तम आरोग्यासाठी व्यायाम (Exercise and hearth) महत्त्वाचा असतो. व्यायामामुळे शारीरिक स्वास्थाबरोबरच (Physical Health) मानसिक आरोग्य (Mental Health) चांगले राहण्यासही मदत होते. यासाठी दररोज नित्यनेमाने व्यायाम करावा असे सांगितले जाते.
सिद्धार्थसारखाच या स्टार्सनीही गमावलाय जीव; Herat Attack नंतर तातडीचे 5 उपाय
आजच्या काळातील जीवनशैलीमुळे तरुण वयातच (death at Young Age) मधुमेह (Diabetes), रक्तदाब (Blood Pressure), हृदय विकार (Heart Problems) असे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यायाम करण्यावर भर दिला जातो. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराबरोबरच व्यायामही आवश्यक असतो. याकरता कार्डिओ (Cardio) प्रकारातील खास व्यायाम केले जातात. मात्र असे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणंही आवश्यक आहे.
Sidharth Shukla च्या टीमकडून आली पहिली Reaction, 'प्लीज एवढं करा...'
कारण विशिष्ट प्रकारच्या व्यायामाने हृदयविकाराचा म्हणजेच हार्ट अॅटॅकचा (Heart Attack) धोका वाढत असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अनेकदा व्यायाम करतानाच किंवा नियमित व्यायाम करणाऱ्या तरुण व्यक्तींचाही हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नियमित व्यायाम फिटनेससाठी चांगला असेल तरी काही व्यायामही वाढवतात हृदय विकाराचा धोका, असं एका अभ्यासात पुढे आलं आहे. हृदयाचे स्नायू (Heart Muscles) बळकट करण्यासाठी आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा (Cardio Vascular Problems) धोका कमी करण्यासाठी दररोज 150 मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाचे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र उच्च तीव्रतेचे व्यायाम आणि अतिश्रम केल्याने हृदयविकाराच्या तक्रारी निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, असा निष्कर्ष एका अभ्यासात समोर आला असून, सर्क्युलेशन (Circulation) या नियतकालिकात हा अभ्यास अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, अति व्यायामामुळे अचानक कार्डियाक अरेस्ट (एससीए-SCA) किंवा अचानक कार्डियाक डेथ (एससीडी- SCD) होण्याचा धोका वाढू शकतो. धावपटूंवर (Runners) केलेल्या अभ्यासानुसार, धावणे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या रक्ताच्या नमुन्यात हृदयाशी संबंधित समस्यांशी संबंधित बायोमार्कर (Biomarker) असल्याचे आढळले आहे. हे मार्कर सहसा स्वतःहून जातात, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती तीव्र गतीच्या शारीरिक हालचाली करते. तेव्हा ते मार्कर पुन्हा कार्यरत होतात आणि हृदयाच्या भोवती जाड भिंती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात किंवा त्यामुळे हृदयाला जखमही होऊ शकते. उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे कार्डियाक अरेस्ट किंवा हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लोकांना अचानक हार्ट अॅटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो, असे या अभ्यास अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
नुकताच खरेदी केलं होतं लक्झरी घर; इतकी होती Sidharth ची संपत्ती
व्यायाम आरोग्यासाठी लाभदायी असतो, मात्र प्रत्येकाने आपल्या शारीरिक क्षमतेनुसार (Physical Strength) व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीनं दररोज 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणे आवश्यक आहे. विनकारण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे घातकच असते. आनुवंशिक (Genetic) किंवा हृदयासंबधीचे आजार असलेल्या लोकांनी तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. व्यायाम करताना काहीही त्रास झाला तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणंही अत्यंत महत्त्वाचे आहे.
सुशांतच्या मृत्यूशी जोडलं जातंय सिद्धार्थच्या मृत्यूचं रहस्य
दीर्घकालीन आरोग्यदायी आयुष्यासाठी लोक व्यायाम करतात; पण ते करताना केलेला अतिरेक किंवा दुर्लक्ष जीवावर बेतू शकतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heart Attack, Heart risk, Sidharth shukla, Types of exercise