मुंबई, 2 सप्टेंबर: TV अभिनेता आणि बिग बॉसमुळे चर्चेत आलेला (Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla) सेलेब्रिटी सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla dies at 40) अकाली मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कोणताही आजार, लक्षणं नसताना सिद्धार्थचा अचानक हार्ट अटॅकच्या कारणाने मृत्यू झाल्याचं समजतं. सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुरू आहे.
सिद्धार्थ शुक्लाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जीव गेलेला होता, अशीही माहिती पुढे आली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त केला नाही आहे. त्याच्या मृत्यूबाबत कोणतीही शंका किंवा संशयास्पद मृत्यू झाला असावा असं कुटुंबातील कोणत्याही सदस्याने म्हटलेलं नाही आहे. सिद्धार्थ कोणत्याही मानसिक तणावाखाली देखील नव्हता, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली आहे.
Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे 5 अपडेट
'आम्ही सगळेच दुःखात आहोत. धक्क्यातून सावरत आहोत. सिद्धार्थला खासगीपणा जपायला आवडायचा. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करू या. सिद्धार्थच्या आत्म्त्यात शांती मिळो ही प्रार्थना', असं ब्रँड अँड बझ या पीआर टीमने अधिकृत पत्रात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bollywood actor, Heart Attack, Sidharth shukla