अवघ्या चाळीसाव्या वर्षी कुठलाही आजार नसताना अभिनेता आणि Bigg Boss विजेता सेलेब्रिटी सिद्धार्थ शुक्लाने जीव गमावला. ही बातमी चांगलीच धक्कादायक ठरली.
टीव्ही अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू करणारा सिद्धार्थ शुक्ला Bigg Boss सारखा रिअॅलिटी शो जिंकून चांगलाच प्रसिद्ध झाला होता.
सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला, असं सांगण्यात येत आहे. सिद्धार्थ कसल्या तणावाखाली होता का, याचीही चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) चा पती राज कौशल (Raj Kaushal) यांचं दोनच महिन्यांपूर्वी आकस्मित निधन झालं. पतीच्या अचानक जाण्याने अभिनेत्री मंदिरालाही मोठा धक्का बसला आहे.
राज कौशलनंतर आता सिद्धार्थ शुक्लाने आपला जीव हार्ट अटॅकमुळे गमावला आहे. तुमच्या आसपासच्या किंवा जवळच्या व्यक्तीला असा अचानक हार्ट अटॅक आला तर तात्काळ केलेले छोटे छोटे उपाय त्या रुग्णाचा जीव वाचू शकतात.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला मळमळतं. अशा वेळेस त्या रुग्णाला एका कडेवर वळवा. असं केल्याने त्याला मोकळा श्वास घेता आल्याने त्याची तीव्रता कमी होते. तसंच फुप्फुसांना नुकसान होत नाही.
रुग्णाच्या मानेजवळ हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर तो 60 ते 70 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब झपाट्याने वाढतो आणि रुग्णाची प्रकृती नाजूक आहे असं समजून तात्काळ रुग्णालयात हलवा.
पल्स रेट कमी जास्त होत असेल तर रुग्णाला झोपवून त्याचे पाय वर उचला. यामुळ पायाकडचा रक्तप्रवाह त्याच्या हृदयाकडे वळतो. असं केल्याने त्याला बऱ्यापैकी आराम मिळतो.
रुग्णाला झोपवल्यानंतर त्याचे कपडे जरा सैल करा. अशा परिस्थितीत त्याला जास्त हालचाल करायला लावू नये. रुग्णाने गाडी चालवता कामा नये, तसंच जिने चढणं-उतरणं टाळावं.
असं झाल्यानंतर रुग्णाभोवती जास्त गर्दी करू होणार नाही याची काळजी घ्या. त्याला पुरेशी हवा मिळेल नीट श्वास घेता येईल येची काळजी घ्या. अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट यापैकी कोणतीही एक गोळी रुग्णाला द्यावी.
महत्त्वाची गोष्टी म्हणजे रुग्णवाहिका ताबडतोब बोलवा. बहुतांश रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहत असल्यामुळे लगेच त्याच्यावर उपचार सुरू केले जाऊ शकतात.