Home /News /lifestyle /

Sexual Wellness : शरीरसुखासाठी नुसतं सेक्स नव्हे, एकमेकांशी प्रेमळ संवादही आहे महत्त्वाचा

Sexual Wellness : शरीरसुखासाठी नुसतं सेक्स नव्हे, एकमेकांशी प्रेमळ संवादही आहे महत्त्वाचा

प्रेम प्रकरणाच्या वादातून आरोपीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रेम प्रकरणाच्या वादातून आरोपीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'माझा तिच्यावर विश्वास आहे परंतु शरीरसुखात तिची कमी झालेली रुची आणि टोचून बोलणं मला संभ्रमात टाकत आहे.'

प्रश्न : 26 व्या वर्षी आमचे लव्ह मॅरेज झाले असून आर्थिकदृष्ट्या आता सक्षम आहोत. माझी पत्नी सध्या शरीरसुखामध्ये (sex life) रस दाखवत नसून नेहमी जिममधील आकर्षक दिसणाऱ्या मुलांविषयी आणि त्यांच्या बॉडीविषयी चर्चा करत असते. तू माझ्याबरोबर बॉयफ्रेंडसारखे वागत  जा अन्यथा मी दुसरा पार्टनर शोधेन असे टोमणे ती मला नेहमी मारत असते. मी नवीन स्टार्टअप सुरू केल्याने आणि तीदेखील नोकरी करत असल्याने मागील अनेक दिवसांपासून आमच्यामध्ये व्यवस्थित संभाषण देखील झालेलं नाही. माझा तिच्यावर विश्वास आहे परंतु शरीरसुखात तिची कमी झालेली रुची आणि टोचून बोलणं मला संभ्रमात टाकत आहे. मी दिसायला सर्वसाधारण असून तिच्या पैशाच्या आणि शरीरसुखाच्या मागण्या खूपच वेगळ्या असल्याने माझ्यामागे काय सुरू आहे, याचा मला अंदाज येत नाही. ------------------------------------------------------ तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून. ---------------------------------------------------- उत्तर : सर्वात आधी लक्षात घ्या. एका मुद्यात तुमच्या प्रश्नामध्येच तुमचे उत्तर आहे. तुमच्या माहितीप्रमाणे मागील अनेक दिवसांमध्ये तुमचे आणि पत्नीचे व्यवस्थित संभाषण झाले नाही. त्यामुळे तुम्ही संभाषणाच्या माध्यमातून देखील तुमची सध्याची स्थिती सावरू शकता. तुमच्या पत्नीचे टोमणे आणि चिडवण्यामुळे तुम्ही नक्कीच चिंतेत आहात. यामुळे तुम्हाला असुरक्षित देखील वाटत आहे. त्याचबरोबर तुमचे सर्वसाधारण दिसणे आणि आर्थिक बाजूमुळे तसेच लैंगिक क्षमतेमुळे देखील तुम्ही स्वतःला असुरक्षित समजत असाल. या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घेऊ शकता. त्याचबरोबर तुमच्या पत्नीला देखील याविषयी सांगणे गरजेचे आहे. तिच्या टोचून बोलण्यामुळे तुम्हाला फरक पडत असल्याचे तिला कळणे गरजेचे आहे. भलेही ती मस्करीत हे म्हणत असेल परंतु यामुळे तुम्हाला फरक पडत असल्याचे तिला समजायला हवे.

''तिनं EX बाबत सांगितलं पण सेक्सबाबत नाही; त्यांच्यात तसं काही झालं असेल का?'

तुम्हाला चिडवण्यात तिला प्रवृत्त करते ती गोष्ट कोणती आहे, हे शोधण्याची संधी म्हणून आपण याचा वापर करू शकता.  तिने 'तू एखाद्या प्रियकरासारखे वागायला हवे' असे सांगितले आहे, असे आपण म्हटले आहे. यामध्ये तुम्ही लग्नाआधी प्रेमात असताना प्रणय आणि जिव्हाळ्याचा काळ ती मिस करत असेल म्हणून असे वागत असल्याचीदेखिल शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा आपले आयुष्य खूप व्यस्त होते आणि आपण पैसे कमवण्यासाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण का पैसे मिळवण्यासाठी इतकी धडपड करत आहोत हे विसरून जातो. या कठीण काळात थोड्या वेळासाठी सुट्टी घ्या, तिला विश्रांती घेण्यास सांगा आणि एकत्र एका लहान सुट्टीचे किंवा सहलीचे नियोजन करा. Sexual Wellness : 'ओरल सेक्स किळसवाणं वाटतं; ते खरंच सुरक्षित असतं का?' आपण डेटिंग करताना कदाचित  भेट दिलेले असे काही ठिकाण! या ठिकाणी देखील तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला पूर्ण ब्रेक घेणे शक्य नसेल तर कमीतकमी आपले वर्क-लाइफ हेल्दी आहे की नाही याची खात्री करून घ्या. ऑफिसचे घरी  काम न करण्याचं, एकत्र जेवण करण्याचं  किंवा सकाळी एकत्र फिरायला जाण्याचं प्रॉमिस करा.  शक्य तितक्या वेळा आपण क्वालिटी टाइम एकत्र घालवत आहोत का याची खात्री करा. टीव्ही किंवा फोन न वापरता केवळ दोघांनी एकत्र वेळ घालवा. Sexual Wellness: पॉर्न पाहून हस्तमैथुन करण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होईल का? आपल्या जोडीदारासह आपल्या भावना आणि असुरक्षिततांबद्दल  स्पष्ट आणि प्रामाणिक असण्यात कोणतीही लाज वाटू देऊ नका. नेहमी आपल्या भावना दाबून ठेवणे आणि गुप्त ठेवणे चुकीचे ठरू शकते. यामुळे संबंध आणखी बिघडू शकतात. यामुळे विविध  शंका आणि असुरक्षितता निर्माण होतील. Sexual Wellness : स्त्रीच्या आकर्षक नाभीची पडले भूल; हे नॉर्मल आहे का? जर ती एक चांगली, सहानुभूतीशील आणि संवेदनशील  स्त्री असेल तर ती तुमची चिंता आणि भावना नक्कीच समजून घेईल. त्याचबरोबर आपल्याला त्रास देण्याचे देखील थांबवेल आणि आपल्याबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करेल. प्रत्येक नात्यावर काम करण्याची गरज असते. अगदी लग्नानंतरही! लग्नानंतरही हे सुरूच असते. हे संबंध सुधारण्यासाठी दोघांकडूनही समान वेळ, प्रयत्न, संभाषण आणि वचनबद्धता आवश्यक आहे. त्यामुळे वेळ काढून यावर एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या