Home /News /lifestyle /

Sexual Wellness : स्त्रीच्या आकर्षक नाभीची पडली भूल; हे नॉर्मल आहे का?

Sexual Wellness : स्त्रीच्या आकर्षक नाभीची पडली भूल; हे नॉर्मल आहे का?

तिच्या बेंबीकडे पाहिलं की मन खुळावल्यासारखं होतं. हे असलं आकर्षण नॉर्मल आहे का? मी माझ्या पार्टनरला याविषयी सांगितलं तर...

तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून. प्रश्न : मला स्त्रीच्या नाभीचं विशेष आकर्षण वाटते. या आकर्षणामुळे मी कल्पनेत रमतो. काही स्त्रिया याबाबत तक्रार करतात. मी अद्याप अविवाहित आहे. मात्र भविष्यात मी माझ्या पार्टनरबरोबर ही बाब शेअर करू का असा प्रश्न मला नेहमी पडतो. तिला हे विचित्र तर नाही वाटणार? ही भावना शेअर करण्यासाठी काही वेगळा मार्ग आहेत का? उत्तर : आपण सर्वांनीच हिंदी चित्रपटांमध्ये असा सीन पाहिला असेल की एक साडी नेसलेली सुंदर स्त्री पंख्यासमोर बसली आहे. आणि पंख्याने हवेची झूळूक तिच्या अंगावर येते. हळूवारपणे तिच्या पोटावरचा साडीचा पदर उडून बाजूला होतो आणि त्याचवेळी तिची आकर्षक बेंबी दिसावी म्हणून कॅमेरामन तिथं कॅमेरा झूम करतो. हे फक्त बॅलिवूडमध्येच नाही तर बेली बटण (नाभी) हा संभोगापूर्वीच्या उत्तेजनासाठी एक महत्वाचा शारिरीक भाग मानला जातो. आपण जर पाहिलं असेल तर सर्व बेली डान्सर्स आपली नाभी अधिक आकर्षक दिसावी, यासाठी त्यावर विशेष मेहनत घेतात. बेली बटन पिअर्सिंगसुद्धा करून घेतलं जातं. नाभी हा कामवासना उत्तेजित करणारा शरीराचा महत्वाचा भाग आहे. स्त्रियांकडे आकर्षित होणाऱ्या अनेक पुरुषांसाठी नाभी हे प्रमुख आकर्षण असू शकते. स्त्रीचा हा भाग तिची मादकता अधिक ठळकपणे अधोरेखित करतो. नाभीचं आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे. बेली बटणचं आकर्षण हे जगभरातील अगदी सामान्य अशी बाब समजली जाते. 2012 मध्ये गुगलवर बेली बटणविषयी सर्वाधिक सर्च केलं गेलें त्यावर्षी याबाबतचं सर्चिंग जगात दुसऱ्या क्रमांकावर होतं. 'मला बायकोमध्ये आता रस वाटत नाही, Extra Marital Affair साठी मन खुणावतं' जर तुम्ही पहिल्याच डेटला तुझं बेली बटण खूपच आकर्षक आहे, असं एखाद्या स्त्रीला सांगितलं तर ते खूपच विचित्र वाटेल. मात्र लैंगिक बाबींविषयी बोलताना किंवा सेक्स करताना तुम्ही जर नाभीविषयी बोललात तर अगदी उचित ठरू शकतं. Sexual Wellness : "मला Casual Sex हवंय; पण तिच्या मनातलं कसं ओळखू?" वास्तविक नाभी हा विषयवासना उत्तेजित करणारा आणि संवेदनशील असा शारिरक भाग आहे. इतर जेनिटल्समध्ये असणारे टिश्यू आणि नाभीचे टिश्यू सारखे असतात. त्यामुळे नाभीला स्पर्श करणं, चुंबन घेणं या बाबी सेक्स दरम्यान अधिक आनंद देऊन जातात. "तो खूप उत्तेजित असतो पण मी लवकर थकते; SEX करताना त्याला साथ कशी देऊ?" नाभीची जागा ही ब्लॅडर आणि योनी दरम्यान स्थित आहे. गुप्तांगातील मज्जातंतू हे नाभीशी जोडले गेले आहेत. यामध्ये कोणतीही गुंतागुंत नसून तुमच्या जोडीदारास उत्तेजित करण्याचं कामच नाभी करते. जोपर्यंत तुमचं नाभीबाबतचं आकर्षण अनियंत्रित होत नाही किंवा सेक्सबद्दलच्या विचारांवर परिणाम करू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. खरं तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या या आकर्षणाविषयीची बाब स्पष्टपणे मांडा, पण योग्य वेळी. यामुळे तुम्हाला आणि जोडीदाराला आनंदाचा नवा मार्ग सापडू शकतो.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या