Home /News /lifestyle /

Sexual Wellness: पॉर्न पाहून हस्तमैथुन करण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होईल का?

Sexual Wellness: पॉर्न पाहून हस्तमैथुन करण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होईल का?

नव्या गोष्टींचा आणि पोझिशन्सचा वापर करून मला सेक्स करणं आवडतं. पण गर्लफ्रेंडला तसं आवडत नाही. त्यामुळे मी रोज पॉर्न फिल्म पाहून हस्तमैथुन करतो. याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होईल का?

प्रश्न :  मला लैगिंक उत्तेजना आवडते. परंतु, माझ्या गर्लफ्रेंडला सेक्स करणं आवडत नाही. नव्या गोष्टींचा आणि पोझिशन्सचा वापर करुन मला सेक्स करणं आवडतं. परंतु, मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत असंतुष्ट आहे. त्यामुळे रोज पॉर्न फिल्म (Porn) पाहून हस्तमैथुन (Masturbate) करतो. ही बाब माझ्या आरोग्यावर परिणाम करणारी आहे का ? -------------------------------------------------------------- तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून. ------------------------------------------ उत्तर : रोज पॉर्न पाहून हस्तमैथुन करणे ही बाब आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम करणारी नाही. तसेच तुमच्या रिलेशनशिपसाठी देखील घातक नाही. कामविषयक वासना मनात असताना एखाद्याला डेट करणे खूपच अवघड असते. विशेषतः जेव्हा तुम्ही अगदीच तरुण असता. रिलेशनशिपमध्ये सेक्स म्हणजे सर्व काही नसते. परंतु सेक्स हा रिलेशनशिपमधील महत्वाचा भाग असतो. समाधानी जीवनासाठी लैगिंक संबंध हे अत्यंत महत्वाचे असतात.

Sexual Wellness : 'मी गेल्या वर्षभरापासून कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये आहे, पण...'

बऱ्याचदा महिलांसाठी बेडरुमच्या बाहेर लैंगिक गोष्टींना सुरुवात होते. त्यामुळे लैंगिक बाबी वगळून तुम्ही तुमच्या रिलेशनशिपवर लक्ष केंद्रीत करावे. तिला घरी कॅाफीसाठी बोलवा. प्रेमाने तिचा किस घ्या, तिचे कौतुक करा. दैनंदिन जीवनात प्रेमळपणे वागल्याने आणि तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केल्याने तुमचे नाते अधिक समृद्ध होऊ शकते आणि तुम्ही लैंगिक संबंधासाठी अधिक जवळ येऊ शकता. "तो खूप उत्तेजित असतो पण मी लवकर थकते; SEX करताना त्याला साथ कशी देऊ?" याव्यतरिक्त एकमेकांसोबत काहीतरी वेगळे करून पाहा. जेव्हा लैंगिक संबंध येतो. त्यावेळी प्रत्येकजण एका वेगळ्या भूमिकेत प्रवेश करतो. अशावेळी जर तुम्ही तिच्याकडे लैंगिक संबंधांसाठी पाठपुरावा केला तर ती रागाच्या भरात तीव्र प्रतिक्रिया देऊ शकते किंवा दडपण अनुभवते. या कारणांमुळे ती तुमच्यापासून दूर जाण्याचादेखील प्रयत्न करु शकते. अशावेळी तुम्ही तुमच्यात बदल केला पाहिजे. सर्वप्रथम तिला काही काळ विश्रांती दिली पाहिजे. तसेच सेक्सविषयी दडपण घेऊ नको असे तिला समजावले पाहिजे. उत्तेजना असताना या बाबी करणे खूपच अवघड आहे. परंतु नात्यात काही नवीन घडत नाही या विषयावर वाद घालत बसण्यापेक्षा नवी गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. 'मला बायकोमध्ये आता रस वाटत नाही, Extra Marital Affair साठी मन खुणावतं' फिटनेस क्लबला जा, नवीन कौशल्ये शिका ते वापरण्यासाठी नवीन गोष्टी करा. जेव्हा तुम्ही तिला चिडवण्याचा किंवा मोहात पडण्यासाठी प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही लैंगिक संबंधाच्या जवळ जाल. लैंगिक संबंध म्हणजे केवळ लैंगिक क्रिया नसून तो एक आनंदाचा भाग आहे. अनेकदा स्त्रियांसाठी चिडवणे, प्रतीक्षा करायला लावणं किंवा उत्सुकता निर्माण करणं याबाबी प्रत्यक्ष कृतीपेक्षाही अधिक आनंददायी असतात. लैंगिक अपेक्षेशिवाय तिला प्रेमळ स्पर्श करण्यासाठी स्वतः प्रोत्साहित करा. 'मी 24 वर्षांचा असूनही सिंगल आहे, कधीतरी कुणी सोबत असावं असं वाटतं' ही बाब एकमेकांना सुसह्य करण्यासाठी महत्वाची ठरेल. ही क्रिया तुमचे सद्यःस्थितीत असलेले दृष्टीकोन दूर करुन तुम्हाला लैंगिकता आणि तुमचे नाते याची नव्याने ओळख करुन देईल. तसेच अशी कोणती वेळ असते की ज्यावेळी आपण अधिक उत्तेजित असतो यावर लक्ष केंद्रीत करा. तसेच कोणत्या वेळी आपल्या गर्लफ्रेंडला सेक्स करण्याचा मूड नसतो हे जाणून घेत त्यावरही काम करणे आवश्यक आहे. हे सर्व उपाय करुनही जर तुम्हाला अपयश आले तर माझा असा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडशी खुलेपणाने संवाद साधा. जेव्हा ती तिच्या समस्य़ांविषयी तुमच्याशी बोलेल तेव्हा तिच्याविषयी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करु नका. लक्षात ठेवा की सेक्सपेक्षाही रिलेशनशिप ही कित्येक पटींनी महत्वाची आहे. तुम्ही तोंड देत असलेली समस्या ही केवळ तिच्याशी किंवा तुमच्याशी निगडीत नसून ती रिलेशनशीपशी निगडीत आहे. प्रश्नाचे कंगोरे समजून घ्या. तिला जर काही बदल अपेक्षित असेल तर तिला मदत करा. तुमच्या प्रश्नांवर तुम्हाला दोघांना काम एकत्र काम करावे लागणार आहे. अखेरीस हे मान्य करा की तिच्या तुमच्याकडे अनेक गरजा आहेत. असे असले तरी तुम्हा दोघांना मान्य असेल असा परिणामकारक तोडगा शोधण्याचा प्रयत्न करा.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या